राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने एका महिन्याच्या आतच हजाराचा टप्पा ओलांडला. त्यात मंगळवारी (ता.७) १५० नवीन रुग्णांची भर पडली. यात १०० रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तर, १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने एका महिन्याच्या आतच हजाराचा टप्पा ओलांडला. त्यात मंगळवारी (ता.७) १५० नवीन रुग्णांची भर पडली. यात १०० रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तर, १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात ९ मार्चला पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर प्रत्येक दिवशी कोरोनच्या संसर्गाचे निदान होऊ लागले. एक महिन्याच्या आतच राज्यात कोरोनाबाधित एक हजार १८ रुग्णांची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागात झाली. राज्यात १२ कोरोना बाधित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कोविड बाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत. मंगळवारी झालेल्या मृत्यूपैकी ६ मुंबईत, ३ पुण्यात तर प्रत्येकी एक मृत्यू नागपूर, सातारा आणि मीरा भाईंदर येथे झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने वाढू लागली आहे. मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे १०० नवे रुग्ण सापडले. त्यामुळे बाधितांचा आकडा ५९० वर पोहोचला. त्यापैकी बहुतेक रुग्ण वरळी, प्रभादेवी, दादर, धारावी, गोवंडी, अंधेरी या भागांतील असल्याचे समजते. नव्या १०० रुग्णांपैकी ५५ जण प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांच्या संपर्कात होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी घेतलेली शोधमोहीम, दवाखाने आणि संशयित रुग्णांच्या चाचणीतून ही माहिती समोर आली.

निजामुद्दीन येथून परतलेल्यांचा शोध निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील सहभागी झालेल्या नागरिकांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २३ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, बुलडाणा जिल्ह्यात ६ आणि प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि नगर भागातील आहेत. तर, प्रत्येकी एक जण हिंगोली, जळगाव आणि वाशीम मधील आहे.

तीन हजारांवर सर्वेक्षण पथके राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या साताऱ्यात २१४ सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर हिंगोलीत ३४, सांगलीत ३१, रत्नागिरीमध्ये ३९ आणि जळगावमध्ये ४८ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे तीन हजार ४९२ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १२ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. महाराष्ट्रातील मंगळवार (ता.७) पर्यंतची स्थिती..

  • नमुन्यांची तपासणी : २०, ८७७
  • नमुने निगेटिव्ह : १९,२९०
  • नमुने पॉझिटिव्ह : १०१८
  • घरगुती विलगीकरणात : ३४, ६९५
  • संस्थात्मक विलगीकरणात : ४००८
  • बरे झालेले रुग्ण : ७९
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com