राज्यात कोरोनाचे १६,४०८ नवीन रुग्ण

राज्यात रविवारी (ता.३०)तब्बल १६,४०८ रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७,८०,६८९ झाली आहे. दिवसभरात ७,६९० रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर २९६ मृत्यूची नोंद झाली
राज्यात कोरोनाचे १६,४०८ नवीन रुग्ण
राज्यात कोरोनाचे १६,४०८ नवीन रुग्ण

मुंबई : राज्यात रविवारी (ता.३०) तब्बल १६,४०८ रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७,८०,६८९ झाली आहे. दिवसभरात ७,६९० रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर २९६ मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा २४,३९९ वर पोहोचला आहे.

रविवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ४३ मृत्यू गेल्या आठवड्यातील आहेत. उर्वरित ३३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात सध्या १,९३,५४८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत ५,६२,४०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात रविवारी झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे परिमंडळात ७९, पुणे येथे ५०, नाशिकमध्ये ३३, कोल्हापुरात ५१, औरंगाबादेत १०, लातूर मंडळात १६, अकोला मंडळात १० तर नागपूर येथे ४५ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर ३.१३ टक्के एवढा आहे. राज्यात रविवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ४०,८४,७५४ नमुन्यांपैकी ७,८०,६८९ (१९.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,०९,६७६ लोकं होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३५,३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com