राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईन

राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने बाधितांची एकूण संख्या ६७,६५५ झाली आहे.
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईन
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईन

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने बाधितांची एकूण संख्या ६७,६५५ झाली आहे. तसेच, विविध शहरांमध्ये मिळून ८९ कोरोना रुग्णांचा मृत्यू होऊन राज्यातील मृतांची एकूण संख्या २२८६ इतकी झाली आहे. राज्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मागील आठवड्यात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे. सध्या राज्यात ५,५८,१०० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३४,४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २७ एप्रिल ते २७ मे या कालावधीतील आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com