नवीन ३० कापूस खरेदी केंद्रे राज्यात नियोजित ः पाटील

राज्यात ३० नवीन कापूस खरेदी केंद्रे नियोजित असून, त्यापैकी ११ केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत.
balaseheb patil
balaseheb patil

मुंबई : राज्यात ३० नवीन कापूस खरेदी केंद्रे नियोजित असून, त्यापैकी ११ केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत. याचबरोबर कापूस खरेदीसाठी नोंदणी करताना  प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील एका केंद्राची निवड करून ‘ॲप’द्वारे त्यांची संपूर्ण माहिती अद्ययावत करावी. जेणेकरून शासनाकडे शेतकऱ्यांची अचूक माहिती संकलित होईल आणि कापूस परतावा योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.  राज्यात सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राचा आढावा व नवीन कापूस खरेदी केंद्रे सरू करण्याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कापूस पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांच्या वतीने ११३ कापूस खरेदी केंद्रांद्वारे १,१२,५७४ शेतकऱ्यांचा ३०.८६ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. पणन महासंघाद्वारे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ३० कापूस खरेदी केंद्रांपैकी नागपूर, वणी, यवतमाळ, अकोला, खामगाव, औरंगाबाद, परभणी, परळी, नांदेड आणि जळगाव या ११ ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती या वेळी संबंधितांनी दिली.  ``उर्वरित केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. याचबरोबर २०१९-२० मध्ये खरेदी केलेल्या कापसावरील प्रक्रिया करून झाल्यावर ज्या प्रमाणात ग्रेडर्स उपलब्ध होतील त्या प्रमाणात आवश्यकतेनुसार महासंघाद्वारे जास्तीत जास्त कापूस खरेदी केंद्रे सुरू करा`` असे  निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

‘ॲप’द्वारे नोंदणी करा शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ, कापूस लागवडीच्या अनुषंगाने ७/१२ ची तपासणी, बँक खात्याची माहिती आणि आधार कार्डद्वारे ओळख पटविणे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर केंद्राद्वारे ‘ॲप’चा वापर करण्यात यावा. ज्या तालुक्यात कापूस पीक पेऱ्याचे क्षेत्र जास्त आहे, मात्र तेथे जिनिंग-प्रेसिंग सुविधा उपलब्ध नाही, त्यांना नजीकच्या तालुक्यातील जिनिंग-प्रेसिंगशी संलग्न करण्याचे नियोजन करून खरेदी केंद्रे सुरू करावीत. सरकी आणि रुईच्या नुकसानीबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही पणनमंत्री पाटील यांनी दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com