agriculture news in Marathi new 30 procurement centers proposed for cotton procurement Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नवीन ३० कापूस खरेदी केंद्रे राज्यात नियोजित ः पाटील

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

राज्यात ३० नवीन कापूस खरेदी केंद्रे नियोजित असून, त्यापैकी ११ केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत.

मुंबई : राज्यात ३० नवीन कापूस खरेदी केंद्रे नियोजित असून, त्यापैकी ११ केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत. याचबरोबर कापूस खरेदीसाठी नोंदणी करताना  प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील एका केंद्राची निवड करून ‘ॲप’द्वारे त्यांची संपूर्ण माहिती अद्ययावत करावी. जेणेकरून शासनाकडे शेतकऱ्यांची अचूक माहिती संकलित होईल आणि कापूस परतावा योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

राज्यात सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राचा आढावा व नवीन कापूस खरेदी केंद्रे सरू करण्याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कापूस पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांच्या वतीने ११३ कापूस खरेदी केंद्रांद्वारे १,१२,५७४ शेतकऱ्यांचा ३०.८६ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. पणन महासंघाद्वारे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ३० कापूस खरेदी केंद्रांपैकी नागपूर, वणी, यवतमाळ, अकोला, खामगाव, औरंगाबाद, परभणी, परळी, नांदेड आणि जळगाव या ११ ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती या वेळी संबंधितांनी दिली. 

``उर्वरित केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. याचबरोबर २०१९-२० मध्ये खरेदी केलेल्या कापसावरील प्रक्रिया करून झाल्यावर ज्या प्रमाणात ग्रेडर्स उपलब्ध होतील त्या प्रमाणात आवश्यकतेनुसार महासंघाद्वारे जास्तीत जास्त कापूस खरेदी केंद्रे सुरू करा`` असे  निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

‘ॲप’द्वारे नोंदणी करा
शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ, कापूस लागवडीच्या अनुषंगाने ७/१२ ची तपासणी, बँक खात्याची माहिती आणि आधार कार्डद्वारे ओळख पटविणे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर केंद्राद्वारे ‘ॲप’चा वापर करण्यात यावा. ज्या तालुक्यात कापूस पीक पेऱ्याचे क्षेत्र जास्त आहे, मात्र तेथे जिनिंग-प्रेसिंग सुविधा उपलब्ध नाही, त्यांना नजीकच्या तालुक्यातील जिनिंग-प्रेसिंगशी संलग्न करण्याचे नियोजन करून खरेदी केंद्रे सुरू करावीत. सरकी आणि रुईच्या नुकसानीबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही पणनमंत्री पाटील यांनी दिले.
 


इतर अॅग्रो विशेष
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...