राज्यात ३९४ नवीन रुग्ण; एकूण बाधितांची संख्या सहा हजारांवर

राज्यात ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधितांचा आकडा ६ हजार ८१७ वर पोहोचला आहे.
राज्यात ३९४ नवीन रुग्ण; एकूण बाधितांची संख्या सहा हजारांवर
राज्यात ३९४ नवीन रुग्ण; एकूण बाधितांची संख्या सहा हजारांवर

मुंबई : राज्यात ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधितांचा आकडा ६ हजार ८१७ वर पोहोचला आहे. शुक्रवारी (ता. २४) १८ बाधितांचा मृत्यू झाला; तर ११७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत एकूण ९५७ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. शुक्रवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत ११, ५ पुण्यात; तर २ मृत्यू मालेगाव येथे झाले. मृतांमध्ये १२ पुरुष; तर ६ महिला आहेत. त्यापैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत; तर ६ रुग्ण ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मृतांपैकी १२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार होते. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या ३०१ झाली आहे.   राज्यातील २६९ मृत्यूचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी असल्याचे आढळले. विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ % इतका आहे; तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो.  ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक १७.७८ % एवढा आहे. त्यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे दिसून येते.

२८ लाख ८८ हजार जणांचे सर्वेक्षण राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून शुक्रवारी एकूण ७ हजार ७०२  सर्वेक्षण पथकांनी २८ लाख ८८ हजार लोकांचे सर्वेक्षण केले. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८ हजार ८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com