agriculture news in marathi New agri laws are attack on farmers Heart: Rahul Gandhi | Agrowon

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मंगळवारी (ता.२९) शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना मोदी सरकारच्या कृषी कायद्यांची तुलना इंग्रजांच्या कायद्यांशी केली.

नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मंगळवारी (ता.२९) शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना मोदी सरकारच्या कृषी कायद्यांची तुलना इंग्रजांच्या कायद्यांशी केली. तसेच सरकारने आधी शेतकऱ्यांच्या पायावर आणि आता त्यांच्या हृदयावर कुऱ्हाडीचे घाव घातले असल्याचा हल्ला चढविला.

संसदेत गदारोळात मंजूर झालेल्या कृषी सुधारणा कायद्यांविरुद्ध विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने रान उठविले असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी स्वपक्षांची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हे कायदे लागू न करण्याचा आदेशवजा सल्लाही दिला आहे. या कायद्यांच्या निमित्ताने पंजाबमध्ये वातावरण पेटले असताना मोदी सरकारच्या कोंडीसाठी राहुल गांधी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये राहुल गांधींची सभा घेण्याची चाचपणीही काँग्रेसने चालविल्याचे कळते. राहुल गांधींनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधून या कायद्यांच्या निमित्ताने मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी या कायद्यांचा ठामपणे विरोध केला असता, अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली. मोदी सरकारला ही गोष्ट कळणार नाही कारण हे लोक इंग्रजांसोबत उभे होते, अशा शब्दांत राहुल गांधींनी चिमटा काढला. हे कायदे नोटाबंदी, जीएसटीनंतरचा आणखी एक वार असल्याचा टोला लगावताना राहुल म्हणाले, की नोटबंदी, जीएसटीमध्ये आणि या नव्या कायद्यांमध्ये काहीही फरक नाही. सरकारने आधी पायावर कुऱ्हाड मारली होती. आता थेट हृदयावर घाव घातला आहे.

गांधी जयंतीच्या दिवशी आंदोलन
पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. किसान मजदूर संघर्ष समितीतर्फे रेल रोको आंदोलन सुरू झाले असून काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर) देशव्यापी निदर्शनांद्वारे केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, या कायद्यांना काँग्रेसशासित राज्ये न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...
चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’...बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते...
नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...