हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम अभ्यासणार

दापोलीतील चार ठिकाणी ही निरीक्षणे घेण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात आंबा प्रक्षेत्रांवर ही मोहीम राबविण्यासाठी पुरेसा निधी आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. पराग हळदणकर यांनी सांगितले.
New agricultural technology benefits farmers: MP Godse
New agricultural technology benefits farmers: MP Godse

रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर काय परिणाम होतात याची निरीक्षणे नोंदवण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. दापोलीतील चार ठिकाणी ही निरीक्षणे घेण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात आंबा प्रक्षेत्रांवर ही मोहीम राबविण्यासाठी पुरेसा निधी आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. पराग हळदणकर यांनी सांगितले.

२००५ पासून दरवर्षी वातावरणातील बदल वेगवेगळे आहेत. त्याला शास्त्रीयदृष्ट्या हवामानातील चढ-उतार म्हटले जाते. कधी पाऊस पडतो, तर कधी उष्मा, थंडीचा जोर कमी अशी वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळते. हवामानातील चढ-उतारांचा आंबा लागवडीवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाकडून पावले उचलण्यात आली आहेत; मात्र त्याला आर्थिक जोड लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. जिल्ह्यात महसूल मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आली आहे. ती स्कायमेट या संस्थेने बसविली आहेत. ही केंद्र असलेल्या परिसरातील आंबा बागांची निवड करून बदलत्या हवामानाचे परिणाम नोंदविण्यात येणार आहेत.

सध्या दापोली तालुक्यातील काही ठिकाणे कोकण कृषी विद्यापीठाकडून निवडली आहेत. याला व्यापक रूप देण्याची गरज असून त्यासाठी अधिकचा निधी लागणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या फंडातून कोकण कृषी विद्यापीठाने कार्यवाही सुरू केली आहे. रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूण यांसह विविध भागांतील वातावरण वेगवेगळे असते. तेथील वातावरण कसे आहे याची नोंद घेऊन त्याचे आंबा बागांवर विपरीत परिणाम कसे होतात याची निरीक्षणे घेतली जाणार आहे.

या सर्वांचा तपशील गोळा करून भविष्यातील आडाखे बांधता येतील. तसेच कीड-रोग आणि त्यावरील फवारणींचे नियोजन, बागायतदारांना खर्च वाचवण्यासाठीच वेळापत्रक निश्‍चित करता येणार आहे. जिल्ह्याचे क्षेत्र अधिक असल्यामुळे १५ ते २० ठिकाणी अशा नोंदी घेणे आवश्यक आहे. दापोली तालुक्यात चार ठिकाणी अशा नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून मदत आली तर त्याचा फायदा निश्‍चितच आंबा बागायतदारांना होऊ शकतो, असा विश्‍वास डॉ. हळदणकर यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com