जनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होईल, अशा औषधी
ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा ः खासदार गोडसे
श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू असलेले कृषी महोत्सवाचे शेतीसाठी मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू असलेले कृषी महोत्सवाचे शेतीसाठी मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांसाठी कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन नवनवीन तंत्रज्ञानाने लाखो लोकांना फायदा झाला आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन दिंडोरी येथील मातोश्री शाकुंतालाताई कृषिभवन येथे झाले. दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते मातीचे पूजन करून प्रारंभ झाला. या वेळी पद्मश्री कल्पना सरोज, नगराध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, नगरसेवक प्रमोद देशमुख, माधवराव साळुंके, दिलीप जाधव, गुलाब जाधव, सुनील आव्हाड, सतीश देशमुख, नरेंद्र जाधव यासह शेतकरी उपस्थित होते. या वेळी दरवर्षीप्रमाणे वनारवाडी येथील शेतकरी जोडप्याचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीस कृषी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी गुरुमाउली श्री. मोरे म्हणाले, की तरुण फारसा शेतीकडे वळत नाही. मात्र यासाठी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने कृषी मेळावा घेतला जातो. गेल्या चाळीस, पन्नास वर्षांपासून केंद्राच्या वतीने ग्रामअभियान सुरू करून सुदृढ पिढी निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. प्रत्येकाने किमान एक गाय पाळावी, एकाही शेतकऱ्याकडे स्वतःचे बियाणे नाही हे वाईट आहे. यासाठी शाकंभरी बीज भांडार या उपक्रमातून ७०० पेक्षा जास्त देशी बियाण्यांचे संवर्धन व संकलन केल्याची माहिती या वेळी देण्यात आली. आयोजक आबासाहेब मोरे यांनी सांगितले, की कृषिविषयक तज्ज्ञांचे ‘दिंडोरी प्रणीत सेवामार्ग’ या यू-ट्यूब चॅनेलद्वारा ऑनलाइन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी ‘कृषियोग’ या सेंद्रिय खते-औषधांच्या ब्रँडचे लोकार्पण गुरुमाउली यांच्या हस्ते करण्यात आले.
- 1 of 1055
- ››