Agriculture news in Marathi New agricultural technology benefits farmers: MP Godse | Page 2 ||| Agrowon

नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा ः खासदार गोडसे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू असलेले कृषी महोत्सवाचे शेतीसाठी मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू असलेले कृषी महोत्सवाचे शेतीसाठी मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांसाठी कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन नवनवीन तंत्रज्ञानाने लाखो लोकांना फायदा झाला आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन दिंडोरी येथील मातोश्री शाकुंतालाताई कृषिभवन येथे झाले. दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते मातीचे पूजन करून प्रारंभ झाला. या वेळी पद्मश्री कल्पना सरोज, नगराध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, नगरसेवक प्रमोद देशमुख, माधवराव साळुंके, दिलीप जाधव, गुलाब जाधव, सुनील आव्हाड, सतीश देशमुख, नरेंद्र जाधव यासह शेतकरी उपस्थित होते. या वेळी दरवर्षीप्रमाणे वनारवाडी येथील शेतकरी जोडप्याचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीस कृषी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी गुरुमाउली श्री. मोरे म्हणाले, की तरुण फारसा शेतीकडे वळत नाही. मात्र यासाठी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने कृषी मेळावा घेतला जातो. गेल्या चाळीस, पन्नास वर्षांपासून केंद्राच्या वतीने ग्रामअभियान सुरू करून सुदृढ पिढी निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. प्रत्येकाने किमान एक गाय पाळावी, एकाही शेतकऱ्याकडे स्वतःचे बियाणे नाही हे वाईट आहे. यासाठी शाकंभरी बीज भांडार या उपक्रमातून ७०० पेक्षा जास्त देशी बियाण्यांचे संवर्धन व संकलन केल्याची माहिती या वेळी देण्यात आली. आयोजक आबासाहेब मोरे यांनी सांगितले, की कृषिविषयक तज्ज्ञांचे ‘दिंडोरी प्रणीत सेवामार्ग’ या यू-ट्यूब चॅनेलद्वारा ऑनलाइन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी ‘कृषियोग’ या सेंद्रिय खते-औषधांच्या ब्रँडचे लोकार्पण गुरुमाउली यांच्या हस्ते करण्यात आले.

 


इतर ताज्या घडामोडी
खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत...जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड...
मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ...जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या...
‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन...परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा...
‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे...सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले...
म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची...सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्...
`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये...परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च...
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व...
प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक...पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी...
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला ...नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात...
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन :...अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व...
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे...नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा...
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ...नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी...
रब्बीसाठी आवर्तन सुटले, गिरणाचे पाणी...जळगाव : खानदेशात प्रमुख प्रकल्पांमधून रब्बी व...
किसान सन्मान योजनेत नगर जिल्ह्याचा...नगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक...
तूरडाळ आयातीचे धोरण बदलावे ः खासदार...बुलडाणा : केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना...
बाजरीचे पीक जोमात, आंतरमशागतीसह खते...जळगाव : खानदेशात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला...
सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला सुरुवात सिंधुदुर्गनगरी ः फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि...
सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन परभणी : महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज देयक...
उन्हाळी नाचणी अकाली पक्वतेची कारणे सध्या राज्यातील काही भागांत नाचणीच्या मुख्य...
...आणि आम्ही वाममार्गावरून ढळलोभारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या  गुलामीतून एकाच...