मोताळा बाजार समितीवर नवीन प्रशासक मंडळ

मोताळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर नवीन प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीला शासनाने मान्यता दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिलेल्या आदेशानुसार प्रशासकीय मंडळात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे.
मोताळा बाजार समितीवर नवीन प्रशासक मंडळ
मोताळा बाजार समितीवर नवीन प्रशासक मंडळ

मोताळा, जि. बुलडाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नवीन प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीला शासनाने मान्यता दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिलेल्या आदेशानुसार प्रशासकीय मंडळात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे.

मोताळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय व्यक्तींचा प्रशासक मंडळात समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या प्रशासक मंडळात मुख्य प्रशासक तेजराव दिनकर वाघ (पिंपळगाव देवी), उपमुख्य प्रशासक उत्तमराव वैराळकर (किन्होळा) तर, प्रशासक म्हणून सुनील चंद्रभान घाटे (पिंपळपाटी), सुरेश मधुकर फाटे (आडविहीर), अ. रफिक अ. लतीफ (कोथळी), विश्वास वासुदेव पाटील (परडा), प्रवीण किसन निमकर्डे (तरोडा), जिजाबाई लक्ष्मण कुकडे (आव्हा युनूसपूर), महादेव हरी कर्नर (सहस्त्रमुळी), शेख मुनीर शेख फत्तु (मोताळा), रफिक सुलेमान बुचर (लपाली), जयंत ज्ञानदेव चोपडे (जहांगीरपूर), भागवत रामराव होनाळे (डाभा), रामशंकर मधुकर सोनोने (धा. बढे), निंबाजी हरिदास पवार (गुळभेली), विकास यशवंत पाटील (टाकळी घडेकर), तेजराव जनार्धन शिंबरे (वाघजाळ), काशीराम विश्वनाथ वऱ्हाडे (पिंप्रीगवळी), राजेंद्र नारायण बोरसे (धा. बढे), नरसिंग सरदारसिंग मोरे (खेडी), धोंडीराम दगडू हाके (सहस्त्रमुळी) आदींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com