agriculture news in Marathi, new five lac farmers add in loan waiver scheme, Maharashtra | Agrowon

व्यक्ती घटक धरल्याने नव्याने पाच लाख शेतकऱ्यांचा समावेश

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत राज्य सरकारने नव्याने कुटुंब हा घटक न मानता कुटुंबातील व्यक्ती हा घटक निश्चित केल्याने नव्याने सुमारे पाच लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील. तसेच त्यांना अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल, अशी शक्यता सहकार खात्यातील उच्चपदस्थांनी वर्तवली आहे. 

गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाने वेळोवेळी कर्जमाफीची व्याख्या बदलून, व्याप्ती वाढवूनही योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. 

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत राज्य सरकारने नव्याने कुटुंब हा घटक न मानता कुटुंबातील व्यक्ती हा घटक निश्चित केल्याने नव्याने सुमारे पाच लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील. तसेच त्यांना अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल, अशी शक्यता सहकार खात्यातील उच्चपदस्थांनी वर्तवली आहे. 

गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाने वेळोवेळी कर्जमाफीची व्याख्या बदलून, व्याप्ती वाढवूनही योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. 

योजनेसाठी ५८ लाख खातेदारांनी अर्ज केले आहेत. तरीसुद्धा राज्यातील शेतकऱ्यांमधील कर्जमाफीच्या लाभाबाबतचा असंतोष, संदिग्धता आणि विरोधकांचे आरोप यामुळे सरकारने नुकतेच योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट शिथिल करून कुटुंबातील प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबाला एकत्रित दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळत होती. म्हणजे कुटुंबप्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला मिळत नव्हती. तसेच एकरकमी परतफेड योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची भरावी लागणारी रक्कम कमी होणार आहे. 

आतापर्यंत सोळा हजार कोटींची कर्जमाफी
बदललेल्या सूत्रामुळे एकंदर पाच लाख कर्जदार नव्याने कर्जमाफी योजनेत समाविष्ट होऊ शकणार आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना सुमारे सोळा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफीच्या प्रलंबित यादीतील शेतकऱ्यांना आणखी एक ते दीड हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच त्यात वाढीव या एक हजार कोटींची भर पडल्यास कर्जमाफीचा एकूण आकडा १८ ते १९ हजार कोटींच्या घरात जाईल, अशी शक्यता मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.


इतर अॅग्रो विशेष
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...
पावसामुळे शेतीकामात अडथळे पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे....
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय...
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...