Agriculture news in marathi New Gram Panchayat elections in the new year | Agrowon

नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका

टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपणाऱ्या १२ हजार ६५५ ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना, आरक्षण व प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन आदी कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २० डिसेंबर ते २१ मार्च २०२० यादरम्यान ही कामे करण्यात येतील. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव अतुल जाधव यांनी नुकताच आदेश काढला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, गावांतील वातावरण तापणार आहे.

पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपणाऱ्या १२ हजार ६५५ ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना, आरक्षण व प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन आदी कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २० डिसेंबर ते २१ मार्च २०२० यादरम्यान ही कामे करण्यात येतील. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव अतुल जाधव यांनी नुकताच आदेश काढला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, गावांतील वातावरण तापणार आहे.

जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान राज्यातील सुमारे १२ हजार ६५५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपत आहे. या सर्व ग्रामपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण, प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन पुन्हा एकदा करावे लागेल. त्यामुळे निवडणूक आयोगाने या संदर्भात आदेश काढला आहे. संबंधित तहसीलदारांनी २० डिसेंबरपर्यंत संबंधित गावांचे नकाशे गुगल मॅपच्या साह्याने तयार करायचे आहेत. संबंधित गावचे तलाठी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ३० डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून प्रभाग पाडणे, प्रभागाच्या सीमा निश्चित करून अनुसूचित जाती, जमातींचे आरक्षण निश्चित करावे. या प्रस्तावाला तहसीलदार अध्यक्ष असलेल्या समितीने १० जानेवारी २०२० पर्यंत मंजुरी देऊन २० जानेवारीपर्यंत तहसीलदारांकडून आवश्‍यक दुरुस्ती करून घ्यावी. ३० जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी  कार्यालयाने सुचविलेले बदल करून प्रारूप प्रभागरचना व आरक्षणाला मान्यता द्यावी. आरक्षणाच्या सोडतीसाठी विशेष ग्रामसभा बोलवण्यासाठी एक फेब्रुवारी रोजी सूचना द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

 चार फेब्रुवारीपर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून प्रारूप प्रभागरचनेवर आरक्षणाची सोडत निघेल. सात फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभागरचना सूचना व हरकतींसाठी सूचना प्रसिद्ध होईल. त्यावर नागरिकांना १४ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील. 

२०११ च्या जनगणनेनुसार निवडणूक 

राज्य निवडणूक आयोगाच्या २००५ च्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या हद्दीत व क्षेत्रात निवडणुकीच्या अगोदर सहा महिने बदल करता येत नाही. प्रभागरचनेला मान्यता देण्याचा अधिकार संबंधित तहसीलदार, अध्यक्ष गटविकास अधिकारी, मंडलाधिकारी सदस्य समितीला आहे. आरक्षणाची सोडतीसाठी बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेस गणपूर्तीची आवश्यकता, ग्रामपंचायतीच्या मान्यतेची गरज नसेल. या निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार घेण्यात येतील. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...