agriculture news in marathi, This is new india : PM Modi | Agrowon

ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो. नवी दिल्ली : आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो. या मतदानाचा आकडा लोकशाहीसह जगातील सर्वांत मोठी घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. 'ये नया हिंदुस्थान है', असेही ते म्हणाले. 

आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो. नवी दिल्ली : आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो. या मतदानाचा आकडा लोकशाहीसह जगातील सर्वांत मोठी घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. 'ये नया हिंदुस्थान है', असेही ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, देश स्वातंत्र्य झाला अनेक निवडणुका झाल्या. पण सर्वाधिक मतदान या निवडणुकीत झाले. 40-42 तापमान असतानाही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भारताच्या लोकशाहीच्या ताकदीला ओळखायला हवे. या निकालाबद्दल निवडणूक आयोग, सुरक्षा व्यवस्थेतील सर्वांचे तसेच लोकशाहीचा विश्वास वाढविणाऱया सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. 

ही निवडणूक आम्ही लढत नसून, देशातील जनता लढत आहे. आमचा हा विजय संपूर्ण जनतेला समर्पित आहे. खांद्याला खांदा लावून काम केलेल्या प्रत्येकाचा विजय आहे. यामध्ये विजयी झालेल्या सर्व प्रतिनिधींचे मी स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो. 

या निवडणुकीत झालेला हा विजय भारताच्या संविधानाला समर्पित आहे. या विजयाबद्दल तुम्हा सर्वांचे कोटी-कोटी आभार. आम्ही कधी थांबलो नाही कधी थकलो नाही तर कधी झुकलोही नाही. आम्ही दोन होतो पण आता दुसऱ्यांदा आलो तर आम्ही आमचे आदर्श, संस्कार हे सर्व कधीही सोडणार नाही. हा विजय आशा-अपेक्षांचा विजय आहे. हा विजय त्या आजारी व्यक्तीचा विजय आहे. त्याच्या आशीर्वादाचा विजय आहे. 


इतर अॅग्रो विशेष
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...