Agriculture news in Marathi, New maize sale started in Manmad market committee | Agrowon

मनमाड बाजार समितीमध्ये नवीन मका विक्री सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

नाशिक : नांदगाव तालुक्यात मका काढणीला सुरवात झाली असून, नवीन काढलेला मका बाजारात विक्रीस येऊ लागला आहे. चालू वर्षी शासनाने १७६० रुपये क्विंटल असा हमीभाव मक्‍याला जाहीर केला आहे. मागील वर्षी हाच दर १७०० रुपये प्रतिक्विंटल होता. चालू वर्षी सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. 

नाशिक : नांदगाव तालुक्यात मका काढणीला सुरवात झाली असून, नवीन काढलेला मका बाजारात विक्रीस येऊ लागला आहे. चालू वर्षी शासनाने १७६० रुपये क्विंटल असा हमीभाव मक्‍याला जाहीर केला आहे. मागील वर्षी हाच दर १७०० रुपये प्रतिक्विंटल होता. चालू वर्षी सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. 

ज्या शेतकऱ्यांनी मका काढणी सुरू केली आहे अशा शेतकऱ्यांनी पुढील भांडवलासाठी विक्री सुरू केली आहे. अजून कळवण, सटाणा, उमराने, लासलगाव या बाजार समित्यांमध्ये नवीन मका लिलावाची सुरवात झालेली नाही. मनमाड बाजार समितीत आवक सुरू झाली आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पीक संरक्षणासाठी मोठा खर्च चालू वर्षी मका उत्पादकांना करावा लागला आहे. 

त्यामुळे उत्पादनखर्चात बियाणे, कीटकनाशके असा ६ ते ८ हजार प्रतिएकरी खर्च वाढला. त्यातच दरवर्षी सरासरी १५ पोते एकरी उत्पादन मिळते. मात्र, चालू वर्षी हेच उत्पादन ८ ते ९ पोत्यांवर आल्याचे नांदगाव तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे एकरी जरी ५ क्विंटलप्रमाणे उत्पादन घटले तरी चालू बाजारभावाप्रमाणे एकरी ८ ते १० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत दोन आठवडे उशिरा मका बाजारात विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे मक्याच्या प्रतवारीनुसार भाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना चालू हंगामासाठी पैशांची गरज असल्याने मालाची चुकवती रोख स्वरूपात करण्यात सुरवात झाली आहे. हंगाम चांगला होईल खात्री आहे.
- प्रतीक बंब, मका व्यापारी, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती

लष्करी अळीमुळे मक्याची वाढ झाली नाही. त्यात प्रादुर्भाव अधिक असल्याने एकरी पाच पोते उत्पादन कमी झाले. औषध व फावरण्यांचा खर्च वाढला. मात्र यंदा उत्पन्न घटणार आहे. 
- गोपीनाथ बागूल, 
मका उत्पादक शेतकरी, सावरगाव, ता. नांदगाव


इतर ताज्या घडामोडी
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...