Agriculture news in Marathi New Onion variety NHO 920 developed by NHRDF karnal, Haryana | Agrowon

कांद्याची नवी जात विकसित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

फलोत्पादन क्षेत्रात संशोधन व विस्तार कार्य क्षेत्रात आघाडीवर असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या (NHRDF) कर्नाल (हरियाना) येथील विभागीय संशोधन केंद्राने ‘एनएचओ-९२०’ ही कांद्याची नवी जात विकसित केली आहे.

नाशिक : फलोत्पादन क्षेत्रात संशोधन व विस्तार कार्य क्षेत्रात आघाडीवर असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या (NHRDF) कर्नाल (हरियाना) येथील विभागीय संशोधन केंद्राने ‘एनएचओ-९२०’ ही कांद्याची नवी जात विकसित केली आहे. लेट रब्बी हंगामासाठी या जातीच्या लागवडीच्या प्रायोगिक चाचण्या सुरू झाल्या आहेत. इतर कांदा जातींच्या तुलनेत ही जात लवकर म्हणजेच ७५ ते ८० दिवसांत तयार होते, अशी माहिती या जातीचे पैदासकार आणि केंद्राचे उपसंचालक डॉ. बी. के. दुबे यांनी दिली.  

संशोधनाबाबत माहिती देताना पैदासकार डॉ. दुबे म्हणाले, की कांद्याची नवीन जात विकसित करण्यासाठी चार वर्षे संशोधन सुरू होते. सातत्यपूर्ण संशोधन व चाचण्या घेतल्यानंतर या जातीचा काढणी कालावधी नेहमीच्या जातींपेक्षा १५ ते २० दिवसांनी कमी झाला आहे. हवामानाचा विचार करता सध्या ही जात उत्तर भारतातील राज्यात लागवडीसाठी प्रक्षेत्र चाचण्यांनंतर उपलब्ध होईल. सध्या संशोधन प्रक्षेत्रावर प्रति हेक्टरी सरासरी ३५० ते ४०० क्विंटल उत्पादन मिळाले आहे.

या जातीची संशोधन केंद्रामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लागवड करून विविध निरीक्षणे नोंदविलेली आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुसा (दिल्ली) येथील राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संशोधन कार्यालयाकडून या जातीस ‘नॅशनल आयडेंटिटी नंबर’ मिळाला आहे. त्यामुळे उत्तर भारतातील शेतकऱ्यांना लवकरच ही जात उपलब्ध होणार आहे. अखिल भारतीय कांदा व लसूण संशोधन प्रकल्पांतर्गत या जातीची लागवड करून विविध निरीक्षणे नोंदविण्यात येत आहेत.

हरियानामध्ये प्रायोगिक लागवड
संशोधन केंद्राच्या माध्यमातून हरियाना राज्यातील काही निवडक शेतकऱ्यांना ५० किलो बियाणे प्रायोगिक तत्त्वावर वितरित केले आहे. या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर लागवड ते काढणीदरम्यान विविध टप्प्यांवर निरीक्षणे नोंदवून घेतली जाणार आहे. यासह शेतकऱ्यांचे अभिप्राय संकलित केले जाणार आहेत.

‘एनएचओ-९२०’ ही कांद्याची नवी जात अधिक तापमान असणाऱ्या भागासाठी अनुकूल नाही. ही जात लेट रब्बीसाठी आहे. हरियाना राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर या जातीच्या चाचण्या सुरू आहेत. सध्या तरी इतर राज्यांतील कांदा उत्पादक पट्ट्यात या जातीच्या लागवडीच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत. काही शेतकऱ्यांना प्राधिनिक स्वरूपात बियाणे देऊन लागवडी करण्यात येत आहेत. परीक्षणे तपासून पुढील वर्षी वाण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. बी. के. दुबे, कांदा पैदासकार व उपसंचालक, विभागीय संशोधन केंद्र, ‘एनएचआरडीएफ’, कर्नाल, हरियाना


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...