मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
बातम्या
ऑनलाइन पद्धतीने शेतीचे नवीन तंत्रज्ञान जाणावे ः डॉ. लाखन सिंग
जालना: ‘‘लॉकडाउनच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ऑनलाइन पद्धतीने शेती विषयक नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यावे’’, असे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संस्थेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांनी केले.
जालना: ‘‘लॉकडाउनच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ऑनलाइन पद्धतीने शेती विषयक नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यावे’’, असे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संस्थेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांनी केले.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित केलेल्या ‘आंबा प्रक्रिया व मूल्यवर्धन’ या विषयावरील ऑनलाइन प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. केव्हिकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सोनवणे यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन केले.
डॉ. सिंग म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूच्या संकटात सुद्धा ‘केव्हिके’ने आपल्या विस्तार कार्यक्रमात खंड न पडू देता कृषी विज्ञान मंडळाचे मासिक चर्चासत्र प्रशिक्षण कार्यक्रम युट्यूब, फेसबुक, ऑडिओ कॉन्फरन्स आदीद्वारे सुरू ठेवून शेतकऱ्यांना मदतच केली आहे.’’ लॉकडाउन काळात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री आणि प्रशिक्षित ग्रामीण युवकांच्या मदतीने फार्म टू किचन ऑनलाइन ॲपद्वारे शहरातील नागरिकांना घरपोच सेवा सुरू केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
शेतकऱ्यांनी प्राथमिक प्रक्रिया भर देऊन शेती उत्पादनात वाढ करावी. बचत गटाच्या महिलांनी कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला घेऊन आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवावे. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामुळे हळद लागवडीतून चांगला नफा मिळाल्याचे मोसा (ता. मंठा) येथील शेतकरी नामदेव माथने यांनी सांगितले.
ऑनलाइन भाजीपाला विक्रीची संकल्पना केव्हिकेमुळे साध्य झाल्याचे प्रतिपादन तरुण उद्योजक प्रवीण धनगाव यांनी केले. कृषिभूषण उद्धव खेडेकर यांनी सुद्धा या प्रशिक्षणास उपस्थिती लावली. हे प्रशिक्षण चार दिवसाचे आहे. या प्रशिक्षणात जालना, परभणी, औरंगाबाद, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यातून जवळपास ३५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षण २३ तारखेपर्यंत चालणार आहे. अन्नतंत्र विभागाचे विषय विशेषज्ञ शशिकांत पाटील व गृह विज्ञान तज्ञ संगीता गायकवाड प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
- 1 of 1494
- ››