agriculture news in Marathi new option of NCDEX for commodity price Maharashtra | Agrowon

चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा नवा पर्याय

अनिल जाधव
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

 ज्या प्रमाणे शेतकरी पीक विमा घेऊन नुकसानीपासून संरक्षण घेतो, त्याप्रमाणे ‘पुट ऑप्शन’ घेऊन आपला दर संरक्षित करू शकतात. 

शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स) काळाची गरज बनली आहे. ऐन हंगामात बाजारात आवक वाढल्यानंतर शेतीमालाचे बाजारभाव अचानक कोसळतात आणि बऱ्याच वेळा उत्पादन खर्चापेक्षाही कमी दरात शेतकऱ्यांना माल विकावा लागतो. ज्या प्रमाणे शेतकरी पीक विमा घेऊन नुकसानीपासून संरक्षण घेतो, त्याप्रमाणे ‘पुट ऑप्शन’ घेऊन आपला दर संरक्षित करू शकतात. शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीओ) माध्यमातून या योजनेत सहभागी व्हावे यासाठी ‘एनसीडीईएक्स’ने विविध सवलती दिल्या आहेत. रब्बी हंगामात मोहरी आणि हरभऱ्यासाठी ‘पुट ऑप्शन्स’ योजना आणली आहे.

नॅशनल कमोडिटी ॲण्ड डेरिव्हेटिव्ह्‌ज एक्स्चेंज लिमिटेडने (एनसीडीईएक्स) ‘ऑप्शन्स इन गुड्स’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला ‘सेबी’कडून नियामक फीद्वारे पाठबळ दिले गेले आहे. नियामकांकडून डेरिव्हेटिव्ह्‌ज मार्केटमध्ये ‘एफपीओ’ किंवा शेतकऱ्यांच्या सहभाग होत नव्हता. या उपक्रमामध्ये ‘एफपीओ’ चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या मोहरी आणि हरभरा दोन शेतीमालाचा ‘पुट ऑप्शन्स’ खरेदी करू शकतात.

‘एफपीओ’ किंवा शेतकरी यांना पेरणीच्या वेळी त्यांच्या पिकाची विक्री किंमत संरक्षित करण्याची संधी ‘पुट ऑप्शन्स’मधून मिळेल. यातून त्या काळात वाढलेल्या किमतीचा लाभ घेता येईल. ‘पुट ऑप्शन’ घेताना ‘प्रीमियम’ आधीपासूनच माहीत असल्यामुळे शेतकरी लागवड खर्च, प्रीमियमचा खर्च आणि बाजार भाव यांचा अंदाज घेऊन किंमत संरक्षित करू शकतात. या माध्यमातून शेतकरी पारंपरिक बाजार व्यवस्थेतून बाहेर पडून बाजाराचा अंदाज बांधून पिके निवडतील आणि त्याचा फायदा निश्‍चितच शेतकऱ्यांना होईल.

‘पुट ऑप्शन’च्या माध्यमातून शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक बाजाराच्या साधनांशी जोडले जातील. ‘एनसीडीईएक्स’शी संबंधित काही ‘एफपीओ’ आधीच ‘ऑप्शन्स’च्या व्यापार सुविधांचा आणि वायद्यांपासून फायदे घेत आहे. शेतकरी हंगामात शेतीमालाच्या किमतीत होणाऱ्या घसरणीपासून संरक्षण करण्यासाठी ‘पुट ऑप्शन्स’चा वापर करून आपला दर संरक्षित करू शकतात.

‘पुट ऑप्शन्स’ समाप्तीच्या दिवशी शेतमाल पोच करून ‘ऑप्शन’ कराराचा व्यवहार पूर्ण केला जाईल. ‘ऑप्शन’ करार देखील मालाची लॉट साइज, गुणवत्ता, वैशिष्ट्ये, डिलिव्हरी केंद्रे, अंतिम सेटलमेंट, मूल्य पद्धती, व्यापाराच्या वेळा इत्यादी बाबी संबंधित ‘फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट’ प्रमाणेच असतील. ‘एनसीडीईएक्स’ ही कृषी डेरिव्हेटिव्ह्‌जच्या क्षेत्रात वस्तूंच्या करारामध्ये ऑप्शन्स सुरू करणारी भारतातील पहिली एक्स्चेंज बनली आहे.

किती मालासाठी योजना
रब्बी हंगामात ‘एनसीडीईएक्स’ने ५ हजार टन मोहरी आणि हरभऱ्यासाठी ही योजना आणली आहे. हा कोटा पूर्ण झाल्यानंतर ‘एनसीडीईएक्स’ कोटा वाढवेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या कोट्यात मोहरी किंवा हरभरा असे वेगळे केले नाही. दोन्ही शेतीमालाचा मिळून कोटा ५ हजार टन झाल्यास ही योजना बंद केली जाण्याची शक्यता आहे.

‘एफपीओ’चा प्रीमियम ‘एनसीडीईएक्स’ भरणार
‘एनसीडीईएक्स’ शेतकरी ‘एफपीओ’ना ‘पुट ऑप्शन्स’मध्ये सहभागासाठी प्रोत्साहन देत आहे. यात शेतकरी उत्पादक कंपनीने ‘पुट ऑप्शन’ घेतल्यानंतर जो प्रीमियम भरावा लागेल तो ‘एनसीडीईएक्स’ देणार आहे. म्हणजे या योजनेत सहभागी होऊन प्रीमियम न भरता ‘एफपीओ’ना सहभागी होता येणार आहे.

‘ऑप्शन’ घेण्यासाठी हे करा
कोणत्याही ‘एफपीओ’ला ‘पुट ऑप्शन’ घ्यायचा असल्यास अगदी सोपी आणि सरळ पद्धती आहे. ‘एनसीडिईएक्स’शी संस्थात्मक रित्या जोडलेले किंवा नोंदणीकृत सदस्य किंवा ब्रोकर यांच्याकडे नोंदणी करून ट्रेडिंग आणि ‘एनसीडिईएक्स’ नॅशनल ई-रिपोजिटरी लिमिटेड अकाउंट (एनईआरएल) खाते उघडणे आवश्‍यक आहे. तसेच हमीपत्र (अंडरटेकिंग) भरून द्यावे लागेल.

अशी होईल डिलिव्हरी
‘एनसीडीईएक्स’वर दर महिन्याचे करार चालतात. समजा २० तारखेला करार समाप्ती होणार असेल तर त्याच्या पाच दिवस आधी टेंडर पीरीयड सुरू होतो. या काळात ‘एफपीओ’ने नोंदणी केलेल्या ब्रोकरला डिलिव्हरी करणार असल्याचे सूचित करावे लागले. त्याप्रमाणे तो ब्रोकर ‘एनसीडीईएक्स’ला कळवेल. त्यानंतर ‘एनसीडीईएक्स’चे गोदाम किंवा ‘डब्ल्यूएसपी’च्या गोदामामध्ये याची सूचना दिली जाईल. तशी माहिती ‘एफपीओ’लाही मिळेल. गोदामांमध्ये जागा राखीव ठेवली जाईल. गोदामांना सूचना दिल्यानंतर सात दिवसांच्या आत तिथे माल पोहोच करावा लागेल. गोदामात माल पोहोचल्यानंतर तेथे मालाची प्राथमिक तपासणी केली जाईल. जसे की, त्यात कीड आहे का? बुरशी लागलेली आहे का? आदी. त्यानंतर तो माल घ्यायचा की परत पाठवायचा याचा निर्णय होईल.

पेमेंटचा कालावधी
‘एनसीडीईएक्स’ने ‘एफपीओं’साठी ‘अरली पेमेंट’पद्धती सुरू केली आहे. गोदामामध्ये करारातील शेतीमाल पोच केल्यानंतर दोन दिवसांत संबंधित ‘एफपीओ’च्या खात्यात मालाचे संपूर्ण पेमेंट जमा होईल. एकदा ‘एफपीओ’च्या खात्यात पेमेंट जमा झाल्यानंतर सभासदांना वाटण्याची जबाबदारी संबंधित ‘एफपीओ’ची असेल.  

सॅम्पल परीक्षण
माल पास झाल्यास प्रत्येक बॅगेवर एक स्टिकर लावला जाईल आणि प्रत्येक बॅगेतून सॅम्पल निवडले जातील. त्या सॅम्पलचे चार भाग करून ‘एफपीओ’, ‘डब्ल्यूएलआर’, ‘एनसीडीईएक्स’ आणि परीक्षणासाठी पाठविले जाते. त्याचा परिणाम सात दिवसांत येतो. त्यानंतर ही एन्ट्री ‘एफपीओ’च्या ‘एनईआरएल’ खात्यात केली जाते.    

जीएसटी खरेदीदाराला द्यावा लागेल
शेतीमालाचा व्यवहार झाल्यानंतर त्यावर लागणार जीएसटी हा खरेदीदाराला द्यावा लागेल. शेतकऱ्यांचा माल असल्याने जीएसटी ‘एफपीओं’ना द्यावा लागणार नाही.

पीक नुकसान झाल्यास
नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा नुकसान झाल्यास ‘एफपीओ’ या करारातून बाहेर पडू शकतात. करार केलेल्या महिन्यातील डिलिव्हरी सेटलमेंटच्या पाच दिवस आधी टेंडर पीरियड सुरू होतो. या काळात त्यांना कराराच्या समाप्तीच्या आधी या करारातून बाहेर पडता येईल. त्यांच्यावर कुठलेही बंधन नसेल. 

वाहतूक विमा
शेतीमाल गोदामापर्यंत पोचविण्याची जबाबदारी संबंधित ‘एफपीओ’ची असेल. वाहतूक करताना अपघात होऊन शेतीमालाची नासाडी झाल्यास भरपाई मिळणार नाही. त्यासाठी ‘एफपीओं’ना वाहतूक विमा काढावा लागेल. शेतीमाल एकदा गोदामात पोच झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी ‘एनसीडीईएक्स’ची असेल.

‘एफपीओं’ना वायदे व्यवहारासाठी सवलती
वाहतूक खर्च ः
गोदामापर्यंत शेतमाल पोचविण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च जेवढा येईल त्याच्या ५० टक्के खर्च ‘एनसीडीईक्स’ करेल. `एफपीओं’ना केवळ ५० टक्के वाहतूक खर्च येईल.
मार्जिन मनी ः ‘एनसीडीईएक्स’वर माल खेरदी किंवा विक्री करायची असल्यास मार्जिन मनी ब्रोकरकडे जमा करावी लागते. ती व्यवहाराच्या १० टक्के १२ आणि १४ टक्के असते. ती ‘एफपीओ’ देण्याची गरज नाही.
गुणवत्ता तपासणी ः करारातील शेतीमालाची डिलिव्हरी दिल्यानंतर त्या मालाची गुणवत्ता तपासणी करावी लागते. त्यासाठी विक्रेत्याला खर्च येत असतो. मात्र, ‘एफपीओं’ना हा खर्च करावा लागणार नाही. त्यांच्यासाठी सवलत देण्यात आली आहे.
ब्रोकर फी ः आपण ज्या ब्रोकरच्या माध्यमातून व्यवहार करतो तो त्या व्यवहारावर फी घेत असतो. ‘ऑप्शन’ घेणाऱ्या ‘एफपीओ’च्या फीमधील ५० टक्के रक्कम ‘एनसीडीईक्स’ देणार आहे. ‘एफपीओं’ केवळ ५० टक्के फी द्यावी लागेल. 

प्रीमियम कसा ठरेल 
ज्या दिवशी सौदा करायचा त्या दिवशी बाजारातील तेजी किंवा मंदीविषयक सेंटीमेंट जेवढे स्ट्रॉंग त्या प्रमाणात ‘पुट ऑप्शन’चे प्रीमियम ठरतात. उदाहरणार्थ, आज बाजारात हरभरा मोठ्या तेजीकडे जाण्याची चिन्हे असतील तर पुट ऑप्शनवरील प्रीमियम तुलनेने कमी असतो. परंतु जर मंदीची चाहूल लागली की हळूहळू प्रीमियम वाढतो. एकंदरीत बाजारभाव जसजसा तेजीकडे जातो तसतसा पुटवरील प्रीमियम कमी होत जातो. तर बाजार मंदीकडे सरकतो त्या प्रमाणात पुट ऑप्शनवरील प्रीमियम वाढत जातो. बाजारभावातील चढ-उतारांचा वेग  आणि ऑप्शन्स प्रीमियम चढ-उतारांचा वेग हा सुरुवातीपासून सारख्या प्रमाणात नसतो. जसजसे ऑप्शन समाप्तीकडे जाईल तसतसा हा वेग समान होत जातो.  याला ऑप्शन प्रीमियमवरील टाइम व्हॅल्यूचा प्रभाव म्हणतात.

कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन
कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशनमध्ये शेतीमालाची गुणवत्ता, ग्रेडिंग, पॅकिंग याविषयीची माहिती सुरुवातीलाच दिली जाते. हरभऱ्याविषयी यात प्रक्रिया न केलेला देशी हरभऱ्याचा समावेश आहे. जो थेट मानवी वापरासाठी नसेल. हा स्वच्छ, काडीकचरा नसलेला, माती, खडे आणि कीड लागलेला नसावा. त्यासाठी पुढीलप्रमाणे मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
हिरवे, अपरिपक्व, आकसलेले आणि फुटलेले दाणे :
तुकडा माल ः
नुकसानग्रस्तः
कीडग्रस्तः
ठिपके असलेला माल ः
आर्द्रता ः ११
मिश्रजातींचा माल ः

काय आहे कमोडिटी मार्केट?
कमोडिटी बाजारात वस्तूंचे व्यवहार होत असतात. शेतीमालाचे व्यवहार ‘एनसीडीईएक्स’ या एक्स्चेंज प्लॅटफॉर्मवर होत असतात. यात कापूस, सोयाबीन, हरभरा, मका, मूग, मोहरी, गवार बी, एरंडेल, सरकी, साखर, हळद, जारे, काळी मिरी, धने या शेतीमालांचे व्यवहार होतात. स्पॉट आणि फ्यूचर या दोन्ही प्रकारचे व्यवहार या प्लॅटफॉर्मवर होत असतात.

प्रतिक्रिया
कृषी पणन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. आधुनिक बाजारपेठांशी जोडणे शेतकरीच नव्हे तर या क्षेत्रातील प्रत्येकासाठीच गरजेचे होत आहे. आम्ही गेली अनेक वर्षे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे यापूर्वीच लाखो शेतकरी ‘एनसीडीईएक्स’शी जोडले गेले आहेत. पुढील काळात ‘सेबी’च्या सहकार्याने ‘ऑप्शन्स’द्वारे देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना एक्स्चेंजशी जोडण्याचा आमचा निर्धार आहे. ‘पुट ऑप्शन’द्वारे केवळ किमतीचे संरक्षणच होते असे नाही तर पेरणीपूर्वीच वेगवेगळ्या पिकांच्या ‘पुट ऑप्शन्स’चे प्रीमियम पाहून ज्यात जास्त फायदा असे पीक निवडण्यास देखील मदत होईल.
— कपिल देव, ‘ईव्हीपी’ आणि बिझिनेस हेड, ‘एनसीडीईएक्स’

आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीचे १५७० शेतकरी सभासद आहेत. आम्ही १० टन हरभऱ्यासाठी २७९ प्रीमिअम भरून ५००० रुपये दर संरक्षित केला आहे. आमच्या कंपनीचे अनेक शेतकरी रब्बी हंगामात हरभरा लागवड करतात. त्यामुळे त्यांना दराचे संरक्षित दिले आहे. 
— वीरेंद्रसिंह सोनदरा, सम्रत शेतकरी उत्पादक कंपनी, उज्जैन, मध्य प्रदेश

‘पुट ऑप्शन’ हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा पर्याय आहे. आम्ही आत्तापर्यंत ११० टन मोहरी आणि १० टन हरभऱ्यासाठी करार केले आहेत. दिवाळीनंतर आम्ही आणखी करार करणार आहोत. शेतकऱ्यांना दराची हमी देणारा हा एक चांगला पर्याय आहे.
— राजेंद्र बिश्‍नोई, संचालक, जंबेश्‍वर, 
डिजिफार्म शेतकरी उत्पादक कंपनी, बिकानेर, राजस्थान


इतर अॅग्रोमनी
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...
बाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...
द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के घट शक्य नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी...
शेतमाल बाजारातील सुधारणा कायम राहीलवॉशिंग्टन ः शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजार यंदा...
अर्जेंटिनात महागाई भडकलीब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...