agriculture news in Marathi, new pest in corn crop, Maharashtra | Agrowon

कर्नाटकात मका पिकात स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डाचा प्रादुर्भाव

वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

बंगळूर ः कर्नाटक राज्यात चिकबल्लारपूर भागात मका पिकात स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा (लष्करी अळीचा एक प्रकार) नावाची नवी कीड मका पिकात आढळली आहे. वेगाने मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव व क्षेत्र विस्तार करण्याची क्षमता असलेल्या या किडीचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आढळले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळूर येथील ‘एनबीएआयआर’ या संस्थेने या किडीच्या धोक्याबाबत वेळीच सावध करीत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 

बंगळूर ः कर्नाटक राज्यात चिकबल्लारपूर भागात मका पिकात स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा (लष्करी अळीचा एक प्रकार) नावाची नवी कीड मका पिकात आढळली आहे. वेगाने मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव व क्षेत्र विस्तार करण्याची क्षमता असलेल्या या किडीचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आढळले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळूर येथील ‘एनबीएआयआर’ या संस्थेने या किडीच्या धोक्याबाबत वेळीच सावध करीत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 

स्पोडोप्टेरा लिट्युरा ही भारतातील बहुपीकभक्षी कीड मानली जाते. महाराष्ट्रासह देशभरात या किडीने उग्र स्वरूप धारण केले आहे. आता याच जातकुळातील आणखी एका किडीची नोंद कर्नाटक राज्यात नुकतीच झाली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) बंगळूर येथील ‘एनबीएआयआर’ संस्थेने त्याबाबत शेतकरी व तज्ज्ञांसाठी इशारा देणारे पत्रक जारी केले आहे. ही संस्था शेतीतील उपयोगी कीटकांबाबत संशोधन करते. 

‘एनबीएआयआर’ संस्थेतील शास्त्रज्ञांच्या पथकाने ९ जुले ते १२ जुलै या कालावधीत कर्नाटक राज्यात सर्वेक्षण मोहीम राबवली. यात स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा या नव्या किडीची नोंद चिकबल्लारपूर येथे प्रामुख्याने आढळली आहे. संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. ए. एन. शैल्य यांनी यासंबंधीची निरीक्षणे नोंदवली आहेत. या किडीचे प्रमाण साधारण ७० टक्क्यांपर्यंत अाढळले आहे. अत्यंत वेगाने अधिक क्षेत्रावर प्रादुर्भाव व नुकसान करण्याची क्षमता या किडीत आहे. मुख्य म्हणजे मका हे महाराष्ट्रासह भारताचे मुख्य पीक आहे. त्यामुळे वेळीच सतर्कता न बाळगल्यास कर्नाटकातील प्रादुर्भावाची व्याप्ती पुढे या राज्यासह अन्य राज्यातही गंभीर रूप धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पुढील अभ्यासाला गती
कर्नाटक राज्यातील हसन, बेलूर व शिमोगा या भागांतही या किडीचा प्रादुर्भाव आढळल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणाहून किडीचे नमुनेही घेण्यात आले आहेत. स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा या प्रजातीच्या या अळीची रेण्वीय तंत्रज्ञानाद्वारे अोळख पटवण्यातही ‘एनबीएआरआय’चे शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत. किडीच्या संदर्भाने पुढील अभ्यासही सुरू असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...