agriculture news in Marathi, new place for SMART office, Maharashtra | Agrowon

'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागा

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

पुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या मुख्यालयाला स्वतःची जागा मिळाली आहे. राज्य शेती महामंडळाच्या मुख्य इमारतीत आता ''स्मार्ट'' ने आपला संसार थाटला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात ''स्मार्ट''ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महत्वाच्या योजनांमध्ये या प्रकल्पाला स्थान दिले आहे. ते स्वतः या प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा वेळोवेळी घेतात. ''स्मार्ट''ला यापूर्वी  पुर्णवेळ अधिकारी अधिकृतपणे नव्हता तसेच कार्यालय देखील नव्हते.

पुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या मुख्यालयाला स्वतःची जागा मिळाली आहे. राज्य शेती महामंडळाच्या मुख्य इमारतीत आता ''स्मार्ट'' ने आपला संसार थाटला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात ''स्मार्ट''ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महत्वाच्या योजनांमध्ये या प्रकल्पाला स्थान दिले आहे. ते स्वतः या प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा वेळोवेळी घेतात. ''स्मार्ट''ला यापूर्वी  पुर्णवेळ अधिकारी अधिकृतपणे नव्हता तसेच कार्यालय देखील नव्हते. ''स्मार्ट’चे प्रकल्प संचालक असलेले कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी मात्र पाठपुरावा करून या दोन्ही समस्या सोडविल्या.

कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे यांना ''स्मार्ट''चे पूर्णवेळ अतिरिक्त प्रकल्प संचालकपद काही दिवसांपूर्वीच देत या प्रकल्पाचे प्रशासकीय कामकाज घट्ट करण्यात आले. आता शेती महामंडळाच्या कार्यालयातील दोन मजले स्मार्टकडे देण्यात आले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती भागातील एमएसीपीच्या मुख्यालयात काही महिन्यांपासून स्मार्टचे कामकाज सुरू होते. 
शेती महामंडळाचे दोन्ही मजले आधी केंद्र शासनाचे पासपोर्ट वितरण कार्यालय होते. ते आता बाणेर भागात स्थलांतरित झाल्यामुळे महामंडळाने ही जागा भाडेतत्त्वावर स्मार्टला दिली.

कृषी आयुक्तांनी सोमवारपासून नव्या कार्यालयात कामकाज सुरू करीत पहिल्याच दिवशी बैठक घेत स्मार्टच्या नियोजनावर चर्चा केली.दरम्यान, स्मार्ट प्रकल्पासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक प्रमुख नेमला जाणार आहे. आत्मा कक्षाकडेच स्मार्टच्या कामाची जबाबदारी दिली जाईल. सध्या बहुतेक जिल्ह्यात संबंधित ''एसएओ'' हेच आत्माचे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहात आहेत. त्यामुळे ''एसएओ''ला स्मार्टचा जिल्हा प्रमुख तर आत्माचा स्मार्टचा समन्वयक राहण्याची शक्यता आहे.

स्मार्टच्या मुख्यालयात ३० कर्मचारी आहेत. ही संख्या देखील वाढविली जाणार आहे. दोन नवे एसएओ तसेच काही उपसंचालक, तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी मुख्यालयात नेमले जातील. अर्थात, मनुष्यबळाचाल अंतिम आराखडा अद्याप ठरलेला नाही.

सहसंचालक दशरथ तांभाळे, एसएओ जीवन बुंदे, उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या बळावर कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून सध्या स्मार्टचा गाडा ''स्मार्ट''पणे चालविला जात आहेत. “विशेष म्हणजे कमी मनुष्यबळ व नवी संकल्पना असतानाही आयुक्तांकडून दिशा आणि प्रोत्साहन मिळते आहे. त्यामुळे विविध अडचणी असल्या तरी ''स्मार्ट''  मुख्यालयातील कर्मचारी वर्ग खूष आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...