कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा देशात नवा उच्चांक

मे महिना सुरू झाल्यापासून देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचा कल चालूच असून मागच्या चोवीस तासांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ५,६११ रुग्ण आढळले आणि १४० जणांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा देशात नवा उच्चांक
कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा देशात नवा उच्चांक

नवी दिल्ली : मे महिना सुरू झाल्यापासून देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचा कल चालूच असून मागच्या चोवीस तासांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ५,६११ रुग्ण आढळले आणि १४० जणांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यानुसार देशात बुधवारी सकाळपर्यंत अधिकृत रुग्णसंख्या १ लाख ०६ हजार ७५० वर, तर मृतांची संख्या ३३०३ वर पोहोचली आहे. कोविड-१९ विषाणूचा विळख्यातून सुटका होऊन रुग्णालयातून घरी परतणार यांची संख्या ४२ हजार २९७ झाली आहे. महाराष्ट्रात बळींचा आकडा सर्वाधिक १३२५ वर गेला आहे. राजधानी दिल्लीतही रुग्णसंख्या वाढती असून राज्य सरकारने लोकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणून बाजारपेठा, टॅक्सी आणि ऑटो रिक्षासह बससेवा सुरू करताच पहिल्याच दिवशी चोवीस तासातील विक्रमी ५०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले.

सर्वाधिक करोनाग्रस्त राज्ये  (बुधवारी सकाळपर्यंतचे आकडे )
राज्य एकूण रुग्ण  बरे  मृत्यू
महाराष्ट्र ३७४३६ ९६३९ १३२५
गुजरात १२१४०  ५०४३ ७१९
दिल्ली  १०५५४  ४७५० १६८
तमिलनाडू  १२४४८  ४८९५  ८४
राजस्थान  ५८४५  ३३३७  १४३
मध्य प्रदेश  ५४६५  २६३०  २५८
पश्चिम बंगाल २९६१  २५०  १०७४
आंध्र प्रदेश २५३२  १६२१  ५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com