झिंक, लोहयुक्त लाल भाताचे (धान) वाण विकसित

rice verity
rice verity

भंडारा ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या साकोली संशोधन केंद्राने (जि. भंडारा) लाल भाता (धान) चा सुधारित वाण विकसित केला आहे. झिंक व लोहयुक्त असलेला हा वाण कीड-रोगांनाही कमी बळी पडणारा असल्याचा दावा या वाणाचे संशोधक व वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुंवर यांनी केला आहे.  भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. एक लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर या ठिकाणी भाताची लागवड होते. त्यामुळेच या भागात धानावरील संशोधनाला चालना मिळावी याकरिता कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. साकोली येथील या संशोधन केंद्राच्या माध्यमातून खरीप २०१९ मध्ये एसकेएलआरआर-१ (साकोली रेड राइस-१) हा लाल तांदळाचा वाण पूर्वप्रसारित करण्यात आला. यंदाच्या वर्षी संयुक्त ॲग्रेस्कोमध्ये हा वाण पूर्व विदर्भासाठी प्रसारित होण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. शामकुंवर यांनी सांगितले.  आरोग्यदायी वाण शेतकऱ्यांच्या शेतात या वाणाचे प्रयोग करण्यात आले आहेत. हा वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरून त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकेल. यात झिंक आणि लोहाचे प्रमाणही जास्त असल्याने कुपोषण दूर करण्यासाठी तो उपयोगी ठरेल, असेही शामकुंवर यांनी सांगितले. अशी आहे चव रेड राइस शिजविताना पांढऱ्या भातापेक्षा मऊ होतो. परंतु चवीच्या बाबतीत मात्र वेगळेपण जपले आहे. हा भात सुरुवातीला चवीला कठीण कवचाच्या (nutty) फळासारखा वाटतो. तीन-चार दिवस सतत खाल्ल्यानंतर या भाताची चव जिभेवर रुळल्याशिवाय राहत नाही, असे डॉ. श्‍यामकुवर सांगतात.  संपर्क : डॉ. श्‍यामकुवर, मो. ९४०३०४९४७२ साकोली रेड राइस १ ची वैशिष्ट्ये 

  • सुधारित वाण, लाल रंग.
  • उत्पादकता- हेक्टरी ४२ ते ४४ क्विंटल
  • कीड-रोगांना कमी बळी पडतो. 
  • तांदूळ खाण्यास उत्तम. अमायलोजचे प्रमाण मध्यम. २५ टक्के. भात मऊ व मोकळा होतो. 
  • पक्व कालावधी- १३५ ते १४० दिवस
  • बारीक, आखूड वाण    
  • लोळत नाही
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com