बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी महाराष्ट्राची’ योजना

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे, देशातील बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ घोषित करण्यात आले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने महिला बचत गटांच्या नावीन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहित करून स्टार्टअप संस्कृतीचा विकास करण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना जिल्हा व तालुकास्तरावर मंच उपलब्ध करून देऊन उत्कृष्ट नावीन्यपूर्ण संकल्पनांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनज्योती अभियान (एनआरएलएम), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम), महिला आर्थिक विकास महामंडळ (एमएव्हीआयएम), उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान (एमएसआरएलएम) तसेच राज्य व केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत किमान एक वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या पंचसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट योजनेत सहभागासाठी पात्र ठरतील. तालुकास्तरावर निवड केलल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता प्रत्येक महिला बचत गटास जिल्हा नावीन्यता परिषदेमार्फत अर्थसह्य करण्यात येईल. तालुक स्तरावर निवड झालेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना जिल्हास्तरीय मंचावर सादरीकरण पात्र ठरतील व त्यांना जिल्हास्तरावर सादरीकरणाची संधी देण्यात येईल.

जिल्हास्तरावर निवड झालेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक महिला बचत गटास २,००,००० रुपयांच्या मर्यादेत जिल्हा नावीन्यता परिषदेमार्फत अर्थसाह्य करण्यात येईल. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांनी सहभागी होऊन आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना द्यावी, अधिक माहितीसाठी पंचायत समितीस्तरावरील एनआरएलएम, तालुका अभियान कक्ष, जिल्हास्तरावर एमएसआरएलएम अभियान कक्ष, जिल्हा परिषद, सोलापूर अथवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक सचिन जाधव यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com