शेतकऱ्यांना साह्यभूत नवनव्या योजना राबविणार : चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांना साह्यभूत नव्या योजना राबविणार
शेतकऱ्यांना साह्यभूत नव्या योजना राबविणार

कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील नवनवे प्रयोग आणण्याबरोबरच शेतकऱ्यांना साह्यभूत होणाऱ्या नवनव्या योजना प्राधान्यक्रमाने राबविण्यावर शासनाचा सर्वाधिक भर राहील,’’ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या जिल्हा कृषी महोत्सवाचा प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, नगराध्यक्षा अलका स्वामी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, प्रातांधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सुधाकर भोसले, गजानन गुरव, मुख्यधिकारी दीपक पाटील, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘शेतकरी सुखी, समृद्ध करण्यावर शासनाचा भर असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून यांना सुविधा उपलब्ध करून देऊन निर्यातीवर भर देण्याचा शासनाचा मानस आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची नवी योजना शासनाने तयार केली असून ही योजना केंद्राकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.’’

महोत्सवात विविध प्रकारचे २१६ स्टॉल कृषी महोत्सवामध्ये २१६ स्टॉल्स उभारण्यात आले असून यामध्ये शासकीय विभागासाठी -४०, कृषिनिविष्ठा, कृषि तंत्रज्ञान व सिंचन-५०, कृषी यांत्रिकीकरण-२०, गृहपयोगी वस्तू-४३, धान्य महोत्सव-२८, खाद्यपदार्थ-२१, सेंद्रिय उत्पादनासाठी -१४ स्टॉल्सचा समावेश आहे. तंत्रज्ञान प्रसार दालनामध्ये कृषी व कृषी संलग्न विभागामार्फत विकसित केलेले तंत्रज्ञान शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी उपयोगी प्रात्यक्षिके जसे ठिबक सिंचन, अन्नप्रक्रिया, मूल्यवर्धन, हायड्रोफोनिक्स, कोल्हापूरी गूळ, सेंद्रीय शेती निविष्ठा, गांडूळ खत, नाडेफ, ॲक्वाकल्चर, जैवतंत्रज्ञान, सौर ऊर्जा वापर, दुग्ध व्यवसाय, कृषिविषयक प्रकाशने, हरितगृह, शेडनेट, पॅकेजिंग, साठवणूक इ. च्या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार फायदेशीर ठरणार आहे. कृषी महोत्सवामध्ये सर्व शासकीय विभाग, कृषिविद्यापीठ, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषी संशोधन संस्था, बँका यांचा सहभाग आहे. महोत्सवामध्ये विषमुक्त सेंद्रिय शेती या संकल्पनेवर भर दिला असून ऊस पिकामध्ये स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा, क्षारपड जमीन सुधारणेसाठी सबसर फेस ड्रेनेज, बांबूपासून बनविलेली तलम कपडे याबाबतचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले आहेत. गट शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना समूह शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com