Agriculture news in marathi; New season papaya soon In the market; Expect good rates | Agrowon

नव्या हंगामातील पपई लवकरच बाजारात; चांगल्या दरांची अपेक्षा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

जळगाव  ः नव्या हंगामातील पपईची काढणी येत्या १५ ते २० दिवसांत सुरू होणार आहे. यंदही शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अतिपावसाने नंदुरबार, धुळे भागात काढणीस काहीसा उशीर होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. 

जळगाव  ः नव्या हंगामातील पपईची काढणी येत्या १५ ते २० दिवसांत सुरू होणार आहे. यंदही शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अतिपावसाने नंदुरबार, धुळे भागात काढणीस काहीसा उशीर होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. 

पपईची काढणी खानदेशात दिवाळीपूर्वी अनेक भागांत सुरू होते. पपई लागवडीसाठी नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा आणि जळगावमधील यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर हा भाग प्रसिद्ध आहे. सर्वाधिक सुमारे तीन हजार हेक्‍टरवर लागवड नंदुरबारात झाली आहे. यापाठोपाठ सुमारे दीड हजार हेक्‍टरवर लागवड धुळ्यात झाली आहे. तर जळगाव जिल्ह्यातही सुमारे १२०० ते १३०० हेक्‍टरवर पपई आहे.

मागील मार्च व एप्रिल महिन्यांत लागवड केलेल्या पपई पिकात फळधारणा व फुलेही जोमात लगडली आहेत. मागील व या महिन्यात पपई पट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे फुलांचे नुकसान झाले. फुलगळ झाली व फळांची वाढही थांबली. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात काळ्या कसदार जमिनीत झाडांनाही अतिपावसाचा फटका बसला. परंतु हलक्‍या किंवा पाण्याचा निचरा व्यवस्थित होणाऱ्या जमिनीत पपईची वाढ बऱ्यापैकी झाली आहे. त्यात येत्या १५ ते २० दिवसांत फळे पक्व होऊन पहिली काढणीदेखील होईल.

यंदा दर जाहीर झालेले नाहीत. पपईची थेट शेतात (खेडा) खरेदीचा प्रघात खानदेशात सर्वत्र आहे. बाजार समितीत रोज आवक फारशी शेतकऱ्यांकडून होत नाही. मागील हंगामात सुरुवातीला प्रतिकिलो १६ ते १७ रुपये दर थेट जागेवर शेतकऱ्यांना मिळाला होता. यंदाही किमान १८ ते २० रुपये प्रतिकिलोचा दर थेट शेतात किंवा जागेवरच दर्जेदार फळांसाठी मिळावा, असे शेतकरी रोहित पटेल (शहादा) म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ६५.१६ टक्के मतदाननगर : नगर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या बारा मतदार...
कोल्हापूर जिल्ह्यात ७४.०८ टक्के मतदानकोल्हापूर ः गेल्या महिन्याच्या कालावधीतील...
४७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुळा...राहुरी, जि. नगर : मुळा धरणात १९७२ पासून पाणी...
खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर...जळगाव  ः खरिपातील ज्वारी, सोयाबीन आदींची...
जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील...जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा...
अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा...अकोला : या भागात अकोला तालुक्यात तसेच...
रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार...अकोला  ः यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला...
मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे...औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१...
परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी,...परभणी : गतवर्षी (२०१८-१९) च्या रब्बी हंगामात...
मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची...सांगली, कोल्हापूर  : जिल्ह्यात सोमवारी...
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...