Agriculture news in Marathi New soybean in mud at Rs. 3881 | Agrowon

बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१ रुपये दर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची काढणी सुरू होऊन बाजार समित्यांमध्ये हळूहळू आवक सुरू झाली आहे. शनिवारी (ता. १९) जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत नवीन सोयाबीनची २० पोते आवक झाली होती. या सोयाबीनला ३८८१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची काढणी सुरू होऊन बाजार समित्यांमध्ये हळूहळू आवक सुरू झाली आहे. शनिवारी (ता. १९) जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत नवीन सोयाबीनची २० पोते आवक झाली होती. या सोयाबीनला ३८८१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पहिले शेतकरी भानुदास हाके (रा. रास्तळ) यांचा बाजार समितीचे उपसभापती राजीव जावळे यांच्याहस्ते रुमाल टोपी देऊन सत्कार करण्यात आला.

या हंगामातील लागवड असलेल्या सोयाबीनची काढणी सुरू झाली. अद्याप हंगाम जोराने सुरू नसला तरी काही ठिकाणी मळणीचे काम सुरू झाले. यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक होत आहे. चिखलीत शनिवारी भानुदास हाके यांनी २० पोते सोयाबीन विक्रीला आणली होती. बाजार समितीत राहुल खबुतरे यांच्या अडतीमध्ये त्यांच्या या सोयाबीनला ३८८१ रुपयांचा दर मिळाला.

यावेळी संजय खबुतरे यांनीही शेतकरी हाके यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक गजानन पवार, प्रभावी सचिव आर. जे. शेटे, डी. आर. जाधव, श्री. देवकर, श्री. खरात, पी. टी. रिंढे यांच्यासह कर्मचारी, अडते, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...
द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन...नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड...
हातचं सारं गेलं, आता जगावं कसं?नाशिक : यंदा वेळेवर पाऊस नसल्याने भाताची रोपे...
धानाच्या हमीभावात ११ वर्षांत केवळ एक...भंडारा: व्यवस्थापन खर्चात दरवर्षी होणारी वाढ,...
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली...
कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेशनाशिक : जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये...
सर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला...गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती,...
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...