सृष्टीला आला नवबहार...! आज चैत्र पाडवा !!!

चैत्र महिन्याच्या अर्थात मराठी नववर्षाच्या प्रारंभी सगळीकडेच बहुगुणी कडुनिंबाच्या झाडांना आलेला भरपूर फुलोरा पाहून सृष्टीला नवबहार आल्याचे चित्र गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला दिसून आले.
New spring has come to creation ...!
New spring has come to creation ...!

रोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : चैत्र महिन्याच्या अर्थात मराठी नववर्षाच्या प्रारंभी सगळीकडेच बहुगुणी कडुनिंबाच्या झाडांना आलेला भरपूर फुलोरा पाहून सृष्टीला नवबहार आल्याचे चित्र गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला दिसून आले.  नववर्षाच्या प्रतिपदेला गुढीची घरोघरी पूजा केली जाते. मात्र, याचवेळी फाल्गुनातील पानगळ थांबून विविध वनस्पतींना नवी पालवी फुटते. हा ऋतु बदल होत असताना आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या कडुनिंबाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  कडूनिंबाचा वापर सौंदर्य प्रसाधना बरोबरच अनेक आजारात केला जातो. शेतामध्ये कीटकनाशक म्हणून कडुनिंबाचा काढा, तेल व पेंडीचा वापर केला जात आहे. डास तसेच कीटकप्रतिबंधक म्हणून पानांचा उपयोग होतो. खोडाची तसेच मुळाची साल रक्तस्त्राव थांबविण्यासाठी उपयुक्त मानली जाते. डिंक औषधी असून त्वचारोगावर वापरतात. पाने वातशामक व मूत्रल असून त्यांचा उपयोग श्वासनलिकांमधून स्त्रवणारा कफ कमी करण्यासाठी होतो. पानांचा काढा हिवतापावर उपयोगी असून यकृताचे कार्य सुलभतेने होण्यास मदत करतो.  जखमा, त्वचेचे रोग, व्रण, आतड्यातील जंत, मधुमेह इत्यादींवर कडू लिंबाच्या काढ्यांचा उपयोग केला जातो. त्याच्या खोडाचा व लिंबोळ्यांचा वापर मूळव्याधीसाठी करतात. तसेच डहाळीचा वापर दात घासण्यासाठी पूर्वीपासून केला जात आहे. त्यापासून काढलेला रस दंतधावनाचा (टूथ पेस्टचा) एक घटक म्हणून वापरतात. प्रतिक्रिया... कडुनिंब ही आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची वनस्पती समजली जाते. त्वचा रोग व शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतोच. परंतु, इतरही आजारात कडुनिंब औषध म्हणून महत्त्वाचा आहे. - प्रसाद तोडकरी, वैद्य, एम. डी. आयुर्वेद, रोपळे बुद्रूक, ता . पंढरपूर 

यंदा भरपूर पाऊस झाला. त्यामुळे कडुनिंबाच्या झाडांना भरपूर फुले लागली आहेत. कडुनिंबाच्या काडीने आम्ही नियमीत दात घासत असल्यामुळे आमचे दात व हिरड्या निरोगी राहण्यास मदत झाली आहे. - नागनाथ माळी, शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com