agriculture news in marathi, New sugar season to start with 70 lakh ton stock | Page 2 ||| Agrowon

पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणार

राजकुमार चौगुले
गुरुवार, 11 एप्रिल 2019

कोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात सुमारे एकशे पाच लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या कारखानदारांच्या हातात पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी आहे. कोट्यानुसार जरी विक्री केली तरी पुढील हंगामात सुमारे सत्तर लाख टन साखर शिल्लक राहू शकते. त्यामुळे पुढील हंगामात कारखान्यांवर आणखी दबाव वाढणार आहे.

कोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात सुमारे एकशे पाच लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या कारखानदारांच्या हातात पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी आहे. कोट्यानुसार जरी विक्री केली तरी पुढील हंगामात सुमारे सत्तर लाख टन साखर शिल्लक राहू शकते. त्यामुळे पुढील हंगामात कारखान्यांवर आणखी दबाव वाढणार आहे.

साखर विक्री ठप्प झाल्याने आता मे ते ऑक्टोबरअखेर जास्तीत जास्त साखर विक्री करण्याचे आव्हान आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साखर विक्री गतीने होईल, असा अंदाज कारखानदारांचा होता; पण तो फोल ठरत असल्याने कारखानादारांपुढे धोक्याची मालिका कायम आहे. 

 एप्रिल सुरू होऊन सप्ताहाचा कालावधी उलटला असला तरी फेब्रुवारी, मार्चच्या कोट्याची साखर विकण्यासाठी कारखानदारांची धडपड सुरू आहे; पण नियमित विक्री होत नसल्याने कारखान्यांचे गळीत हंगाम निराशेच्या गर्तेतच समाप्त होत आहेत.

पुढील हंगामात दुष्काळ गृहीत धरला तरी आणखी ७० लाख टन साखर उत्पादन होऊ शकते. ही सर्व साखर वेळेत विकून बँकेचे कर्ज व एफआरपी देण्याचे आव्हान कारखानदारांपुढे आहेत. यातून ते कसा मार्ग काढणार, याचेही उत्तर त्यांच्याकडे नाही. व्यापारी अद्यापही फारशी मागणी नोंदवत नसल्याने कारखाने हतबल आहेत.

पगार थकबाकीमुळे कामगारांत अस्वस्थता
साखरेचे माहेर समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात व्यस्थापन पातळीवरही कारखान्याची वाईट अवस्था आहे. मोजक्याच चार, पाच कारखान्यांचा अपवाद वगळता बहुतांशी कारखान्यांत कर्मचाऱ्यांचा पगार सहा सहा महिने झालेला नाही. बँकेकडून मिळालेली रक्कम शेतकऱ्यांच्या बिलाला गेली. साखर विक्री नसल्याने चक्र फिरेनासे झाले आहे. यामुळे कारखान्याची अंर्तगत अर्थव्यस्था ठप्प झाली आहे. याचा विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांचे पगार थांबण्यावर झाला आहे. जर परिस्थिती नाही सुधारली तर पुढील हंगामातही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होईल का, याबाबत साशंकताच असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

साखर उद्योगाला अडचणी आल्या आहेतच; पण यातूनही मार्ग निघणे शक्य आहे. कारखानदारांनी निर्यातीच्या पातळीवर गतीने निर्णय घेऊन साखर बाहेर काढण्यासाठी तत्पर उपाययोजना करणे गरजेचे आहे. निर्यातीसाठीचे अनुदान व अन्य लाभ मिळवण्यासाठी साखर विक्री होणे गरजेचे आहे. कारखान्यानी याकडे जास्त लक्ष द्यावे असे वाटते. असे झाले तर पुढील हंगामात काही प्रमाणात कारखानदारांना दिलासा मिळू शकतो. 
- विजय औताडे, साखर तज्ज्ञ


इतर अॅग्रोमनी
पाकिस्तानमध्ये कापूस लागवड १२ टक्‍...नागपूर ः वातावरणातील बदलामुळे उत्पादकतेत होणारी...
कोरोना संकट : कृषी व पूरक उद्योगांसाठी...कोरोना संकटामुळे देशभरात शेतीमाल पुरवठा साखळी...
भारताचा विकासदर दीड टक्क्यांवर येणे...वॉशिंग्टन ः चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा...
साखर निर्यातीच्या प्रयत्नाला कोरोनाचा ‘...नवी दिल्ली : कोरोनाच्या भीतीपोटी आईसक्रीम,...
सहकारामुळे बॅंकिंग अन् शेतमाल विक्रीला...जर्मनीतील सहकारी बँकेमध्ये सीबीएस सिस्टिम उत्तम...
राज्यात शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍...नागपूर ः लॉकडाउनमुळे शासकीय कापूस खरेदी बंद आहे....
जग महामंदीच्या उंबरठ्यावर उभे :...नवी दिल्ली : जागतिक पातळीवर कोविड-१९ च्या...
कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...