agriculture news in marathi, New technology in Drip irrigation | Agrowon

ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण देशमुख

अरुण देशमुख
शनिवार, 20 एप्रिल 2019

राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी केवळ २३ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. त्यातील १७ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली, तर ६ लाख हेक्टर क्षेत्र तुषार सिंचनाखाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, ऊस, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, भाजीपाला व इतर फळपिकांचा समावेश आहे. राज्यातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त क्षेत्रावर वापर करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन व आधुनिक स्वयंचलित यंत्रणेचा वापर, हे मुद्दे कळीचे ठरतात.

राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी केवळ २३ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. त्यातील १७ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली, तर ६ लाख हेक्टर क्षेत्र तुषार सिंचनाखाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, ऊस, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, भाजीपाला व इतर फळपिकांचा समावेश आहे. राज्यातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त क्षेत्रावर वापर करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन व आधुनिक स्वयंचलित यंत्रणेचा वापर, हे मुद्दे कळीचे ठरतात.

महाराष्ट्रात सिंचनाखालील क्षेत्र फक्त १८ टक्क्यांच्या घरात आहे. राज्यातील एकूण ३०७ लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे २२५ लाख हेक्टर क्षेत्रावरती विविध पिके घेतली जातात. पाणी हा सर्वच पिकांच्या उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व निर्णायक घटक आहे. पाण्याचे खास करून वाढत्या तापमानात म्हणजेच उन्हाळ्यात काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन करणे, हे पीक उत्पादनवाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर, कमी खर्चात शाश्वत उत्पादन, जमिनीच्या सुपिकतेची जपणूक या वैशिष्ट्यांमुळे राज्यातील शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करीत आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून त्यासाठी अनुदान दिले जाते. तरीही आजतागायत राज्यामध्ये सर्व पिकांमध्ये मिळून फक्त २३ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. त्यातील १७ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली, तर ६ लाख हेक्टर क्षेत्र तुषार सिंचनाखाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, ऊस, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, भाजीपाला व इतर फळपिकांचा समावेश आहे. 

राज्यातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त क्षेत्रावर वापर करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन व आधुनिक स्वयंचलित यंत्रणेचा वापर हे मुद्दे कळीचे ठरतात. 

जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती (सबसरफेस ड्रिप)

 • ऊस, कापूस, भाजीपाला या पिकांसाठी ही पद्धती अत्यंत योग्य आहे. या पद्धतीमध्ये पाणी व खते थेट पिकाच्या मुळाजवळ दिली जातात. त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये पाणी व खताचा कार्यक्षम वापर होतो. त्यामुळे पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढते.

  सबसरफेस ड्रिपचे फायदे

 • कार्यक्षम पाणीवापर. बाष्पीभवनामुळे, वाहून जाण्यामुळे, तसेच जमिनीत खोलवर पाण्याचा निचरा होणे थांबल्यामुळे पण्याच्या प्रत्येक थेंबाचा उत्पादनवाढीसाठी अतिशय चांगला उपयोग होतो.
 • पाणी व अन्नद्रव्ये थेट उसाच्या मुळाजवळ दिली जातात, त्यामुळे उसाची वाढ चांगली होते. उसावरील इतर ताण कमी होतो.
 • सरी-वरंबा पद्धतीशी तुलना करता ५० ते ५५ टक्के पाण्याची बचत होते, तर पृष्ठभागावरील ठिबक सिंचनाच्या तुलनेत १० ते १५ टक्के बचत होते.
 • ऊस उत्पादनात कमीत कमी ३५ टक्के वाढ होते.
 • जास्तीचे पाणी उसात साचत नसल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
 • रासायनिक खते थेट मुळांभोवती मिळत असल्याने कार्यक्षमता वाढते व खतमात्रेत ३० टक्के बचत होते. 
 • जमिनीच्या पृष्ठभागावरील भाग कोरडा राहत असल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच, आंतरमशागतीची व तोडणीची कामे वेळेवर करणे सोपे जाते.
 • या पद्धतीत इनलाइन ठिबक नळ्या आणि ड्रिपर मजबूत अशा पॉलिमरपासून बनविलेल्या असतात. त्या जमिनीखाली असल्याने सूर्याची अतिनील किरणे, वातावरणातील चढ-उतार आणि जमिनीतील इतर उपद्रवी घटकांपासून सुरक्षित राहतात. पर्यायाने देखभालीचा खर्च कमी होतो.
 •  पद्धतीत ड्रिपनेट पीसी या ड्रिपलाइनचा वापर केल्याने ड्रिपर बंद होत नाहीत, तसेच शेत चढ-उताराचे असेल, तरी सर्व ठिकाणी सम प्रमाणात पाणी देणे शक्य होते, त्यामुळे उसाची वाढही एकसारखी होते.
 • ही यंत्रणा जमिनीखाली असल्याने हाताळणी कमी होते व त्यामुळे या पद्धतीचे आयुर्मानही जास्त असते.
 • ऊस लागण, अंतरमशागत व ऊस तोडणी यांत्रिक पद्धतीने करणे शक्य होते.
 • उसाचे योग्य व्यवस्थापन केल्यास जास्तीत जास्त खोडवे फायदेशीररीत्या घेणे शक्य होते.

कोणती काळजी घ्यावी?

 • ठिबक सिंचन नळी जमिनीत घालताना ट्रॅक्टरचा वेग प्रतितास ६ कि. मी.पेक्षा जास्त नसावा. एक पूर्ण लाइन जमिनीत घातल्यानंतर शेवटी ठिबक नळी ट्रॅक्टरपासून तोडावी.    ट्रॅक्टरला ठिबक नळी कापल्याशिवाय पुढच्या रांगेत जाऊ देऊ नये अन्यथा ड्रिपरची दिशा बदलते.
 • मोठ्या शेतामध्ये नळ्या जमिनीत अगोदर घाल्याव्यात न नंतर उपमुख्य वाहिन्या (सबमेन) जोडाव्यात. 
 • उपमुख्य लाइन बंद करण्यापूर्वी सर्व यंत्रणेतील पाण्याची गळती शोधण्यासाठी त्यातून पाणी सोडावे. जेव्हा सर्व यंत्रणा कार्यान्वित होईल तेव्हा पाण्याचा दाब, दूरवरच्या नळीवरचा पाण्याचा दाब याची तपासणी करून त्या योग्य प्रकारे काम करीत आहेत, याची खात्री करावी. तसेच खत खेचणारा पंप, नियंत्रक यांचे निरीक्षण करून त्यांच्या योग्य जोडणीबद्दल खात्री करून घ्यावी. 
 • ठिबक नळीच्या ५ सें. मी. वरच्या बाजूस ऊस टिपऱ्यांची लागण करावी. उदा. ठिबक नळी १५ सें. मी. खोलीवर असेल, तर ऊस टिपऱ्याची लागण जमिनीपासून १० सें. मी. खोलीवर करावी.
 • गाळण यंत्राच्या (फिल्टर युनिट) सुरुवातीला व गाळण यंत्रणेनंतर पाण्याचा दाब तपासून पाहावा. 
 • शेवटच्या रांगेतील नळीवरचा पाण्याचा दाब कमीत कमी सहा मीटर असावा. 

योग्य ड्रिपलाइनची निवड 

 • पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन वापरताना ऊसलागण जोड ओळ पद्धतीने केली जाते. दोन नळ्यांतील अंतर १.८० मी., तर दोन उसाच्या ओळीतील अंतर ४० ते ५० सें. मी. ठेवले जाते. 
 • चढ -उताराच्या जमिनीत दाबनियंत्रित तोट्या असलेली ड्रिपलाइन वापरावी.
 • एकदम सपाट जमिनीमध्ये एरीज १६ मिमी. व्यासाची ०.८ मिमी. अथवा ०.५ मिमी. जाडी असलेली ड्रिपलाइन वापरावी.

 

जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिपरमधील अंतर व त्याचा प्रवाह बदलतो.
त्याबद्दल खालीलप्रमाणे शिफारस करण्यात येते.

जमिनीचा प्रकार ड्रिपरमधील अंतर (से. मी.) ड्रिपरचा प्रवाह (लिटर / तास) 
खोल काळी 
जमीन
५० १ किंवा  १.६ किंवा २
मध्यम खोलीची जमीन  ४० १.६ किंवा २
उथळ जमीन  ३०

सबसरफेस ड्रिप कसे काम करते?
पाण्याचा जमिनीतील प्रवाह हा मुख्यत्वे कॅपिलरी दाबामुळे नियंत्रित केला जातो. हा दाब सर्व दिशांना सारखा असतो आणि गुरुत्वाकर्षणाचा दाब हा स्थिर व खालच्या दिशेला असतो. जशी जमीन ओली होते तसा कॅपिलरी दाब कमी होत जातो. कोरड्या जमिनीत कॅपिलरीचा दाब हा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापेक्षा जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सर्व दिशांना सारखा असतो. जेव्हा जमीन ओली होत जाते तेव्हा जमिनीतील सर्व पोकळ्यामध्ये पाणी भरल्याने कॅपिलरी दाब कमी होतो व गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव वाढतो आणि पाण्याचा प्रवाह उताराच्या बाजूला सुरू होतो. अशा या साध्या मूलतत्त्वामुळे जर हलके पाणी दिले, तर कॅपिलरी दाबाने त्यावर नियंत्रण ठेवता येते व पाण्याची कार्यक्षमता वाढविता येते. 

देखभाल 

 • महिन्यातून एकदा न चुकता ड्रिपलाइन फ्लश कराव्यात, ज्यामुळे त्यात साठलेली घाण निघून जाईल. ड्रिपलाइन फ्लश करण्याअगोदर सबमेन फ्लश करून घ्याव्यात.
 • पाणी परीक्षण अहवालानुसार आम्ल प्रक्रिया करावी. 
 • उसाच्या मुळ्या ठिबकलाइनमध्ये घुसू नयेत म्हणून पेंड्यामेथेलीनची किंवा त्रेफ्लानची १ मी. लि. आठ ड्रिपरसाठी प्रक्रिया करावी.  

स्वयंचलित यंत्रणा
पिकाला त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार लागणारे पाणी व आवश्यक ती अन्नद्रव्ये पूर्वनियोजनानुसार ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या मुळांशी देणे यालाच सिंचनासाठीची स्वयंचलित यंत्रणा असे म्हणतात. पीकवाढीनुसार शास्त्रीय पद्धतीने ठरवलेली पिकासाठी लागणारी पाणी आणि अन्नद्रव्यांची मात्रा ही एकदा स्वयंचलित यंत्रणेमध्ये नोंदविली, की ही यंत्रणा आपले कार्य सुरू करते. जोपर्यंत शेतकरी नोंदविलेल्या मात्रेत बदल करीत नाही, तोपर्यंत ही यंत्रणा नियमितपणे कार्य करीत राहते. या यंत्रणेच्या साह्याने विहीर अथवा बोअरवेलवरील पंप सुरू करणे व शेतामधील मेनलाइन व सबमेन लाइनवरील नियंत्रण झडपा चालू-बंद करण्याचे काम केले जाते. पाणी खेचण्याचा पंप, गाळण यंत्रणा, मेन आणि सबमेन लाइनवरील नियंत्रण झडपा या इलेक्ट्रीक वायरद्वारे स्वयंचलित यंत्रणेस जोडल्या जातात. ही यंत्रणा २४ व्होल्ट इलेक्ट्रीक प्रवाह असलेल्या सर्व साधनांना स्वयंचलित पद्धतीने चालू व बंद करण्यास मदत करते. 

स्वयंचलित यंत्रणेचे फायदे ः

 • पिकाच्या गरजेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी देणे टाळणे शक्य.
 • विजेच्या भारनियमनावर (लोडशेडिंग) मात. 
 • वीज उपलब्ध असणाऱ्या ठराविक कालावधीमध्ये ठिबक सिंचन यंत्रणा कार्यक्षमरीत्या चालविणे शक्य. 
 • पिकास योग्य प्रमाणात खत व पाण्याचा पुरवठा. 
 • मजुर टंचाई व खर्चावर मात. 
 • ठिबक सिंचन संच योग्य दाबावर कार्यरत. खत व पाणी देण्यात सातत्य.
 • पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये दिलेल्या एकूण पाणी व खताची माहिती संग्रहित ठेवणे. 
 • पिकाचे भरघोस उत्पादन. निव्वळ नफ्यामध्ये वाढ. 

स्वयंचलित यंत्रणेची कार्ये 

 • विहिरीवरचा अथवा पाण्याच्या साधनावरील पंप चालू व बंद करणे.
 •  वाळूची गाळण यंत्रणा निर्धारित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे साफ करणे. 
 • मेनलाइन व सबमेन लाइनवरील नियंत्रण झडपा चालू व बंद करणे.
 • शेतकऱ्याने नोंदविलेल्या माहितीप्रमाणे कार्य सतत सुरू ठेवणे व त्यावर नियंत्रण ठेवणे आणि झालेल्या कार्याची नोंद ठेवणे. 

नेटबीट 
स्वतःची बुद्धी असणारी ही पहिलीच ठिबक सिंचन प्रणाली आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीज, मजूर, पाणी, खते, वाढीव पीक लागवड खर्च या सर्व प्रमुख समस्यांवरचा खात्रीलायक उपाय म्हणून आपण नेटबीट प्रणालीकडे पाहू शकतो. ही प्रणाली सद्यःस्थितीतील पीक, माती, हवामान आणि मागील ५० वर्षांतील पीक पद्धतीच्या संकलित माहिती आधारे पिकांसाठी अनुकूल सिंचन, खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षण आराखडा उपलब्ध करून देते. 

ठिबक सिंचनाचा शोध लागल्यापासून नेटबीट हे सर्वांत मोठे संशोधन ठरले आहे. त्याची महत्त्वाची पाच कारणे खालीलप्रमाणे :

 • सर्वसमाविष्ट ः  स्मार्ट फोनवरून नियंत्रित करू शकणारी एकसंध सुविधा
 • क्लाउड तंत्रज्ञान : इतर स्त्रोतांमधून मिळालेल्या माहितीचे एकत्रीकरण, ॲक्सेस, रिमोट कंट्रोल आणि इंटरनेटवरून साहाय्य व अपडेट्स. 
 • अद्ययावत सिंचन : लहान क्षेत्रापासून, मोठ्या क्षेत्रापर्यंत प्रगतिशील व्यावसायिक शेतकऱ्यांना उपयुक्त 
 • असामान्य बुद्धिमत्ता : ५० वर्षांचा पीक पद्धतींचा अनुभव आणि प्रगत विश्लेषण.
 • वापरायला सहज आणि सोपे.    

मोठ्या क्षेत्रासाठी नेटबीट, तर लहान क्षेत्रासाठी नेटबीट वन या पॅकेजची शिफारस करण्यात आली आहे. नेटबीट पॅकेजमध्ये नेटएमसीयू, नेटआरटीयू, डोजिंग सिस्टिम्स आणि सेन्सरचा समावेश होतो, तर नेटबीट वन पॅकेजमध्ये एमसीयू वन, फरटीवन आणि मूलभूत सेन्सरचा समावेश होतो. 

खत देण्याची यंत्रणा (डोझिंग मशिन)  
फर्टिवन : फर्टिवन ही खत व पाणी व्यवस्थापनासाठी एका वेळी एक खत देण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे मशिन आहे. मांडणी व जोडणीस एकदम सोपे आणि खत देण्यासाठी वा आम्ल प्रक्रिया करण्यासाठी हे डोझिंग युनिट फारच उपयुक्त आहे.  

वैशिष्ट्ये 

 • उत्पादकता : तंतोतत न्यूट्रिगेशनद्वारे पीक उत्पादन, गुणवत्तेत वाढ.
 • एकसमानता : नावीन्यपूर्ण डिझाइनमुळे एकसारख्या प्रमाणात / गुणोत्तरात खत देणे शक्य होते.
 • मापनीयता : पाणी वहनाचा दर ५ क्युबीक मीटर ते ७० क्युबीक मीटर प्रतितास ८ बार दाबापर्यंत मोजणे शक्य होते. 
 • गुंतवणूक : कमीत कमी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा घेणे शक्य होते. 
 • इरिगेशन कंट्रोलरला जोडणी करता येते. 
 • नवीन अथवा जुन्या ठिबक संचाला बसविता येते. 

फर्टिकिट ३ जी

 • फर्टिकिट ही बहुआयामी आणि अचूक व्यवस्थापन करणारी आणि कमीत कमी गुंतवणुकीची गरज असणारी प्रणाली आहे. विद्युत वाहकता निरीक्षण व नियंत्रण सुविधा उपलब्ध असून, या मॉडेलद्वारे अधिक कार्यक्षमतेने खत व पाणी व्यवस्थापन करता येते. 

  वैशिष्ट्ये- 

 • उत्पादकता : तंतोतत विद्युत वाहकता व सामू नियंत्रनाद्वारे पिकाचे उत्पादन व गुणवत्ता अधिक प्रमाणात वाढवता येते. 
 • व्यापकता : एकापेक्षा जास्त डोझिंग चानेलसह (६ युनिटपर्यंत) प्रत्येकी ५० ते १०० लिटर / तास खत देणे शक्य होते.
 • एकसमानता : नावीन्यपूर्ण डिझाइनमुळे एकसारख्या प्रमाणात / गुणोत्तरात खत देणे शक्य होते. 
 • मापनीयता : पाणी वहनाचा दर ५ क्युबीक मीटर ते ७० क्युबीक मीटर प्रतितास ८ बार दाबापर्यंत मोजणे शक्य होते. 
 • गुंतवणूक : वाजवी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा व लवकर परतावा घेणे शक्य होते. 
 • चार मोड्यूल्समध्ये उपलब्ध, ज्यापैकी दोन 
 • मोड्यूल्स बूस्टर पंपविरहित कार्य करतात.  

नेटाफ्लेक्स ३ जी : 
कलात्मक रचनेसह ओपन टाकी असलेली ही प्रणाली अचूक आणि समप्रमाणात खत – पाणी व्यवस्थापनाची खात्री देते. परिवर्तन सुलभ विद्युत वाहकता व सामू नियंत्रणासह ही यंत्रणा व्यवस्थितपणे कार्य करते. या यंत्रणेचा वापर ग्रीनहाउसमध्ये माती व मातीविरहित माध्यमामध्ये करता येतो. 
 
वैशिष्ट्ये

 • उत्पादकता : तंतोतत विद्युत वाहकता व सामू नियंत्रणाद्वारे पिकाचे उत्पादन व गुणवत्ता अधिक प्रमाणात वाढविता येते. 
 • व्यापकता : एकापेक्षा जास्त डोझिंग चॅनेलसह (६ युनिटपर्यंत) प्रत्येकी ५० ते १०० लिटर / तास खत देणे शक्य होते.
 • एकसमानता : ओपन टाकी मिक्सिंग डिझाइनमुळे एकजीव आणि एकसारख्या प्रमाणात / गुणोत्तरात खत देणे शक्य होते. 
 • मापनीयता : पाणी वहनाचा दर ३ क्युबीक मीटर ते ६४ क्युबीक मीटर प्रतितासापर्यंत  मोजणे शक्य होते. 
 • गुंतवणूक : गुंतवणुकीवर सतत जास्तीत जास्त नफा व परतावा घेणे शक्य होते. 

नेटाजेट ४ जी
ही  कमीत कमी ऊर्जेचा वापर करणारी न्यूट्रिगेशन तंत्रज्ञान आधारित प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे जमीन व पिकांच्या प्रकारांनुसार खत-पाणी व संसाधन अनुकूल वापराचे प्रमाण नियंत्रण करणे शक्य होते. अत्यंत अचूक व विश्वसनीय विद्युत वाहकता व सामू नियंत्रण, पाण्याचा कमीत कमी अपव्यय, पर्यावरण प्रदूषणावर काट ही या प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. 

वैशिष्ट्ये : 

 • द्राक्षबाग आणि शेतातील इतर पिकांशिवाय नेटहाउस व ग्रीनहाउसमध्ये ही प्रणाली एकसमान डोझिंग देण्यासाठी वापरतात. 
 • उत्पादकता : तंतोतत विद्युत वाहकता व सामू नियंत्रणाद्वारे पिकाचे उत्पादनात व गुणवत्तेत सातत्याने लक्षणीय वाढ. 
 • व्यापकता : एकापेक्षा जास्त डोझिंग चॅनेलसह (५ युनिटपर्यंत) प्रत्येकी १००० लिटर / तास खत देणे शक्य होते.
 • एकसमानता : नावीन्यपूर्ण मिक्सिंग चेंबरमुळे एकजीव आणि एकसारख्या प्रमाणात / गुणोत्तरात खते देणे शक्य होते. 
 • मापनीयता : पाणी वहनाचा दर ५ क्युबीक मीटर ते ४००  क्युबीक मीटर प्रतितास ८ बार दाबापर्यंत मोजणे शक्य होते. 
 • गुंतवणूक : खतांच्या मिक्सिंग व इंजेक्शनसाठी एकाच पंपाचा वापर केला जात असल्याने ऊर्जेचा वापर कमी होतो. त्यामुळे गुंतवणुकीवर सतत जास्तीत जास्त नफा व परतावा घेणे शक्य होते.    

संपर्क -  ९५४५४५६९०२
(लेखक नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे. येथे सह सरव्यवस्थापक व कृषी विद्या विभागाचे प्रमुख आहेत.)

 


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...