राज्यात दहा नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ७४ वर

दीड हजार नमुने निगेटिव्ह - १,५९२ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह - परदेशातून आलेले एकूण २८४ प्रवासी सर्वेक्षणाखाली - राज्यात ७,४५२ लोक घरगुती विलगीकरणात (होम क्वारंटाइन) - ७९१ जण विविध क्वारंटाइन संस्थांमध्ये
राज्यात नवे दहा रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ७४ वर
राज्यात नवे दहा रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ७४ वर

मुंबई : राज्यात १० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी पुण्यात चार, मुंबईतील पाच आणि नवी मुंबई येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. एच. एन. रिलायन्स रुग्णालयात भरती झालेल्या कोरोनाबाधित ६३ वर्षीय रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. हा राज्यातील दुसरा मृत्यू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेली जी ४१ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली, तिचे चार जवळचे नातेवाईक आज कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘मीच माझा रक्षक’ या संदेशाचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, शनिवारी रात्री रिलायन्स रुग्णालयात एका ६३ वर्षीय पुरुषाचा या आजाराने मृत्यू झाला. हा रुग्ण १९ मार्च रोजी रुग्णालयात भरती झाला होता. त्या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय रोग हे आजार होते. सुमारे १२ वर्षांपूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झालेली होती. या रुग्णाच्या परदेशी प्रवासाबाबत माहिती नाही; परंतु, १५ दिवसांपूर्वी तो गुजरातमधील सुरत येथे गेला होता, असे समजते. कस्तुरबा रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या तपासणीत सदर रुग्ण हा कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (ता. २१) मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची पत्नीही आज कोरोनाबाधित आढळली आहे. याशिवाय कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेले ५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील २ रुग्णांनी अमेरिकेचा, तर प्रत्येकी एकाने स्कॉटलंड, तुर्कस्तान आणि सौदी अरेबिया येथे प्रवास केलेला आहे. या ५ रुग्णांपैकी १ रुग्ण ऐरोली, नवी मुंबई येथील आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com