agriculture news in marathi New ten corona infected patient identified in maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात दहा नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ७४ वर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 मार्च 2020

दीड हजार नमुने निगेटिव्ह
- १,५९२ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह
- परदेशातून आलेले एकूण २८४ प्रवासी सर्वेक्षणाखाली
- राज्यात ७,४५२ लोक घरगुती विलगीकरणात (होम क्वारंटाइन)
- ७९१ जण विविध क्वारंटाइन संस्थांमध्ये 

मुंबई : राज्यात १० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी पुण्यात चार, मुंबईतील पाच आणि नवी मुंबई येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ७४ झाली आहे.

एच. एन. रिलायन्स रुग्णालयात भरती झालेल्या कोरोनाबाधित ६३ वर्षीय रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. हा राज्यातील दुसरा मृत्यू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेली जी ४१ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली, तिचे चार जवळचे नातेवाईक आज कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘मीच माझा रक्षक’ या संदेशाचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, शनिवारी रात्री रिलायन्स रुग्णालयात एका ६३ वर्षीय पुरुषाचा या आजाराने मृत्यू झाला. हा रुग्ण १९ मार्च रोजी रुग्णालयात भरती झाला होता. त्या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय रोग हे आजार होते. सुमारे १२ वर्षांपूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झालेली होती. या रुग्णाच्या परदेशी प्रवासाबाबत माहिती नाही; परंतु, १५ दिवसांपूर्वी तो गुजरातमधील सुरत येथे गेला होता, असे समजते. कस्तुरबा रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या तपासणीत सदर रुग्ण हा कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (ता. २१) मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची पत्नीही आज कोरोनाबाधित आढळली आहे.

याशिवाय कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेले ५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील २ रुग्णांनी अमेरिकेचा, तर प्रत्येकी एकाने स्कॉटलंड, तुर्कस्तान आणि सौदी अरेबिया येथे प्रवास केलेला आहे. या ५ रुग्णांपैकी १ रुग्ण ऐरोली, नवी मुंबई येथील आहे.


इतर अॅग्रो विशेष
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...