शहरी शेतीसाठी योग्य टोमॅटो जातींची निर्मिती

A new tomato ideal for urban gardens and even outer space
A new tomato ideal for urban gardens and even outer space

गेल्या दशकामध्ये शहरीकरण वेगाने वाढत गेले आहे. शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आवश्यक भाज्यांच्या उत्पादन शहरामध्ये घेण्याच्या उद्देशाने संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी येथील संशोधकांनी खास सीआयआयएसपीआर या जनुकीय सुधारणा तंत्राचा वापर केला असून, खास टोमॅटो जातींची निर्मिती केली आहे. या नव्या तंत्रामुळे कमी जागेमध्ये वाढणारी, कमी कालावधी उत्पादन देणारे वाण उपलब्ध होणार आहेत. भविष्यातील शेतीचा विचार करताना केवळ ग्रामीण भागातील शेतीचा विचार करून चालणार नाही, तर शहरी भागाबरोबरच अवकाशाचाही विचार करावा लागणार आहे. या भविष्यातील शेतीसाठी आवश्यक जातींची निर्मिती करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये सीआयआयएसपीआर जनुकीय सुधारणा तंत्राची विशेष मदत घेतली जात आहे. त्याविषयी माहिती देताना कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी येथील प्रो. झॅक लिपमॅन यांनी सांगितले, की ज्या ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण नाही, अशा ठिकाणी लागवडीच्या दृष्टीने अधिक काटक आणि कणखर अशा जातींची निर्मिती करण्यासाठी जनुकीय अभियांत्रिकीद्वारे प्रयत्न केले जात आहेत. आम्ही तयार केलेली टोमॅटो वेलीची रोपे ही आपल्या नेहमीच्या वेली टोमॅटोप्रमाणेच दिसतात. मात्र, त्यांची फळे ही घोसाने आणि घट्ट येतात. भविष्यामध्ये फुलांच्या गुच्छातील गुलाबांची जागा ही पिकलेल्या लालचुटूक चेरी टोमॅटो घेण्याची शक्यता आहे. हे टोमॅटो लवकर पक्व होतात. केवळ ४० दिवसांमध्ये पक्व फळांचे उत्पादन हाती येण्यास सुरुवात होते. या टोमॅटोचा आकार लहान असून, चवीला उत्तम आहेत. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान लिपमॅन यांनी सांगितले, की नव्या पद्धतीने रोपांची लागवड करून उत्पादन घेताना आपण उपलब्ध जागेचा चांगल्या प्रकारे वापर करू शकणार आहे. यामध्ये अधिक खतांचा वापर करण्याचीही आवश्यकता नाही. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या उत्पादनामध्ये विविध समस्या उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जमिनीचा होणारा विविध कारणांमुळे ऱ्हास कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या अशा खराब झालेल्या जमिनीमध्ये पिकांची वाढ करण्यासाठीही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अनेक कारणांमुळे वाया जाणारी जमीन हा लागवडीखाली आणणे शक्य होणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्यांच्या समस्येवर मात करता येईल. असे झाले संशोधन लिपमॅन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एसपी आणि एसपीजी या दोन जनुकांच्या उत्तम नियोजनातून नवी टोमॅटोची जात विकसित केली आहे. ही जनुके रोपांची वाढ आणि आकार यावर नियंत्रण ठेवतात. या जनुकांमुळे रोपांची वाढ थांबून ती लवकर फुलोऱ्यावर येतात. त्यानंतर फळधारणाही वेगाने होते. त्याविषयी माहिती देताना लिपमॅन यांनी सांगितले, की जेव्हा तुम्ही पिकाच्या पक्वतेवर काम करत असता त्या वेळी तुम्ही पिकांच्या संपूर्ण प्रणालीशी खेळत असता. त्यामध्ये पिकामध्ये तयार होणाऱ्या शर्करेचाही समावेश असतो. ही शर्करा पानांमध्ये तयार होऊन पुढे फळांपर्यंत पोचत असते. टोमॅटो फळाच्या गोडीवर परिणाम होऊ नये, यासाठी लिपमॅन आणि सहकाऱ्यांनी तिसऱ्या जनुकांचा (SIER) शोध घेतला. हे जनुक फांद्याच्या लांबीवर नियंत्रण ठेवते. या जनुकांचे कार्य जनुकीय सुधारणा तंत्रांच्या साह्याने रोखण्यात आले. त्याची जोडी अन्य दोन फुलोऱ्यांसाठी कारणीभूत जनुकांच्या म्युटेशनशी घालण्यात आली. त्यामुळे लहान फांद्या असलेले अत्यंत लहान जागेमध्ये वाढू शकणारे टोमॅटोचे रोप तयार झाले. हे संशोधन नेचर बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले. पुढील टप्प्यामध्ये किवीसारख्या फळपिकांवर प्रयोग करण्यात येणार आहेत. शहरी शेतीसाठी नव्या जातींकडून अपेक्षा

  • जागेची कमतरता असल्याने शहरी शेतीसाठी लहान आकारामध्ये वाढणाऱ्या वनस्पतींची आवश्यकता आहे.  
  • कुंड्या किंवा खराब झालेल्या टायरमध्ये माती भरून गोदामे किंवा उपलब्ध जागेमध्ये रोपांची वाढ करता यावी.  
  • अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी संपूर्ण नियंत्रित वातावरणाची उपलब्धता करण्याची गरज आहे.  
  • वेगाने वाढून पक्व होणाऱ्या जातीपासून उत्पादनही अधिक मिळाले पाहिजे.  
  • शक्य तो वर्षभर विविध प्रकारचे उत्पादन घेता आले पाहिजे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com