दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदे
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २५) नव्या हळदीच्या सौद्यास सुरुवात झाली. हळदीला प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ११ हजार इतका दर मिळाला आहे. पहिल्या सौद्याला अडीच हजार पोत्यांची आवक झाली होती.
सांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २५) नव्या हळदीच्या सौद्यास सुरुवात झाली. हळदीला प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ११ हजार इतका दर मिळाला आहे. पहिल्या सौद्याला अडीच हजार पोत्यांची आवक झाली होती.
येथील बाजार समितीच्या आवारातील गणपती सेवा संघामध्ये सभापती दिनकर पाटील आणि सुरेश पाटील यांच्या हस्ते यांच्या हस्ते सौदे सुरू झाले. यावेळी सुरेश पाटील, गोपाळ मर्दा, सचिव आर. ए. पाटील, हळद व्यापारी, अडते, शेतकरी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दिनकर पाटील म्हणाले की, गतवर्षी ऐन हंगामाच्या वेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आला. त्याचा प्रसार होऊ नये यासाठी बाजार समिती बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतर ऑनलाइन हळदीच्या सौद्याला प्रारंभ केला. त्यामुळे हळदीचा उठाव झाला आहे. दरही चांगले मिळाले. सध्या नवीन हळद काढणी शेतकरी करू लागले आहेत. नवीन हळद बाजार समिती येऊ लागली आहे.
शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त शेतीमाल येथील मार्केट यार्डात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी केले. तासगाव येथील शेतकऱ्यांच्या हळदीला प्रतिक्विंटल ७ हजार ५०० इतका दर मिळाला आहे.
गतवर्षी झालेल्या पावसामुळे हळद पिकाला काही प्रमाणात फटका बसला आहे. परंतु उत्पादनात किंचित घट होईल, अशी शक्यता आहे. यंदा दर्जेदार हळद बाजारपेठेत विक्रीला येईल. स्थानिक हळदीच्या पहिल्याच चांगला दर मिळाला आहे. हळदीच्या दर्जानुसार दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी वर्गाने व्यक्त केले आहे.
यंदा नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा. नव्या हळदीला चांगला दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होईल आणि दरही चांगले राहतील.
- दिनकर पाटील, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती
- 1 of 1054
- ››