agriculture news in Marathi, new variety of tuberose developed, Maharashtra | Agrowon

कुंडीत वाढणारी सुगंधी निशिगंधाची जात विकसित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जुलै 2019

पुणे ः व्हर्टीकल गार्डन, लॅन्डस्केप आणि घरात ठेवण्यासाठी उपयुक्त अशा बाजारपेठेची गरज ओळखून पुष्पसंशोधन संचालनालयाने निशिगंधाची जात विकसित केली आहे. ही जात छोट्या उंचीची आणि जास्त सुंगध देणारी आहे. तीन वर्षांच्या संशोधनानंतर स्थानिक प्रक्षेत्रात यशस्वी झालेल्या या जातींच्या अन्य तीन राज्यांमध्ये चाचण्या घेऊन, लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी दिली.  

पुणे ः व्हर्टीकल गार्डन, लॅन्डस्केप आणि घरात ठेवण्यासाठी उपयुक्त अशा बाजारपेठेची गरज ओळखून पुष्पसंशोधन संचालनालयाने निशिगंधाची जात विकसित केली आहे. ही जात छोट्या उंचीची आणि जास्त सुंगध देणारी आहे. तीन वर्षांच्या संशोधनानंतर स्थानिक प्रक्षेत्रात यशस्वी झालेल्या या जातींच्या अन्य तीन राज्यांमध्ये चाचण्या घेऊन, लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी दिली.  

पुष्पसंशोधन संचालनालयाचे मुख्यालय स्थापन झाल्यानंतर मांजरी येथील प्रक्षेत्रावर विविध फुलांवर संशोधन सुरू आहे. या संशोधन प्रक्षेत्रावर १५० पेक्षा जास्त गुलाब आणि २५ पेक्षा अधिक निशिगंधाच्या जातींवर संशोधन सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेता, घरामध्ये ठेवण्यासाठी लहान उंची आणि कुंडीत वाढ होणाऱ्या निशिगंधाच्या जातीवर संशोधन सुरू होते.  

यासाठी  ‘फुले रजनी’ या शेतात उत्पादित होणाऱ्या जातीची मातृवृक्षाची निवड करून, याद्वारे कुंडीत वाढ होणाऱ्या जातीवर संशोधन सुरू होते. हे संशोधन अंतिम टप्पात आहे. मांजरी सह  राज्यातील संशोधन प्रक्षेत्रावर ही जात यशस्वी ठरली आहे. पुढील चाचण्या अन्य तीन राज्यांत करण्यात येणार असून, यानंतर ही जात प्रसारित करण्यात येईल. अद्याप या जातीचे नामकरण करण्यात आले नसून, अंतिम टप्प्यात याचे नामकरण केले जाईल, अशी माहिती डॉ. प्रसाद यांनी दिली. 

रोपवाटिका उद्योगांसाठी उपयुक्त 
रोपवाटिका उद्योगांसाठी ही जात उपयुक्त ठरणार आहे. बाजारपेठेत सुगंधी फुलांच्या कुंड्याची मागणी वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत फुलांच्या जाती उपलब्ध होत नाहीत. बागा, रुग्णालये, कार्यालये, घरामध्ये नैसर्गिक सुंगधासाठी ही जात फायदेशीर ठरेल. शहरातील नागरिकांकडून या जातीला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केला. 

अशी आहेत जातीची वैशिष्ट्ये 

  • उंची २९ सें. मी. (इतर जातींची उंची १०० ते १२० सें.मी.असते.) 
  • इतर जातींपेक्षा अधिक सुंगध
  • एका काडीला साधारण ३१ फुले 
  • एका फुलाची लांबी ५ सें.मी. 
     

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व...
पांढऱ्या सोन्याचे काळे वास्तवकेंद्र सरकारने जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरीप...
‘जीआय’ला प्रोत्साहन राज्यासाठी वरदानकेंद्र सरकारचा २०१९ चा अंतिम अर्थसंकल्प   ...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...
क्षारप्रतिकारक ऊस वाणावर होणार संशोधनपुणे  : भाभा अणुशक्ती केंद्र (बीआरसी) आणि...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे  : बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...