ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्र

A new way to provide cooling without power
A new way to provide cooling without power

कोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक प्रक्रिया मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतील संशोधकांनी विकसित केली आहे. त्याचा वापर अन्नधान्यांसह वैद्यकीय गरजेच्या औषधांच्या साठवणीसाठी करणे शक्य आहे. उष्ण कटिबंधीय देशांमध्ये शीतकरणाची प्रक्रिया ही अत्यंत महागडी पडते. त्यातच ग्रामीण भागामध्ये विजेची उपलब्धता ही सर्वात मोठी अडचण ठरते. या साठी कोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक प्रक्रिया मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतील संशोधकांनी विकसित केली आहे. त्याचा वापर अन्नधान्यांसह वैद्यकीय गरजेच्या औषधांच्या साठवणीसाठी करणे शक्य आहे. हे संशोधन जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

  • अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतील यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधक बिक्रम भाटीया, प्रो. अर्नी लेरॉय, विभाग प्रमुख इव्हलीन वांग, भौतिकशास्त्राचे प्रो. मॅरीन सोल्जासिस आणि सहा सहकाऱ्यांनी शून्य ऊर्जेवर आधारीत शीतकरणाची नवी पद्धत विकसित केली आहे.
  • काय आहे तंत्रज्ञान

  • या तंत्रज्ञानामध्ये प्रकाशातील मध्य अवरक्त किरणातील ( mid-infrared) उष्णतेच्या उत्सर्जनाचा वापर केला जातो. अवकाशातून प्रकाश येताना पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या थरांमध्ये येतो. त्यातील काही भाग शोषला जात असला तरी सरळ येणाऱ्या प्रकाशातील उष्णतेला रोखण्यासाठी या यंत्रणेच्या वरील भागामध्ये धातूची एक लहान पट्टी लावलेली आहे.  
  • सैद्धांतिक पातळीवर या तंत्रामुळे सामान्य तापमानापेक्षा २० अंश सेल्सिअस तापमान कमी करता येते. त्याच्या बोस्टन येथे चाचण्या घेतल्या असता संशोधक ६ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानापर्यंत पोचू शकले आहेत. विविध उपकरणासाठी आणखी शीतकरण आवश्यक असले तरी उर्वरीत तापमानातील घट ही पारंपरिक रेफ्रिजरेशन किंवा थर्मोइलेक्ट्रीक शीतकरणाद्वारे शक्य होऊ शकते.  
  • अन्य काही संशोधकांनी या आधी या तंत्रावर काम केले आहे. मात्र, त्यांच्या प्रणाली या गुंतागुंतीच्या फोटॉनिक उपकरणावर आधारीत असल्याने अधिक महागड्या ठरतात. ही उपकरणे सर्व तरंगलांबीचा सूर्यप्रकाश परावर्तिक करण्यासाठी बनवली आहेत. त्यातील केवळ मध्य अवरक्त किरणे उत्सर्जित करणे आवश्यक आहे. अशा निवडक परावर्तन आणि उत्सर्जनासाठी काही नॅनोमीटर जाडीच्या एकापेक्षा अधिक थरांमध्ये धातू वापरावे लागतात. त्यामुळे त्यांचा प्रसार होण्यामध्ये अडचणी आहेत.  
  • या अवघड तंत्रापेक्षा नवीन तंत्रांमध्ये सूर्यप्रकाशातील अवरक्त किरणांना रोखण्यासाठी योग्य कोनामध्ये एक लहान पट्टी ठेवणे शक्य केले आहे. त्यामुळे सातत्याने सूर्याच्या बदलत्या कोनासोबत कोन बदलण्याचीही गरज राहत नाही. पर्यायाने नवे तंत्र अधिक सोपे बनले आहे. यात प्लॅस्टिक फिल्म, पॉलिश केलेले अॅल्युमिनिअस, पांढरा रंग आणि उष्णतारोधक असे स्वस्त घटक वापरले आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com