agriculture news in marathi New wheat variety developed by NiPhad agri research Centre for pasta | Agrowon

पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे वाण विकसित 

मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा 
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

कुंदेवाडी (ता.निफाड) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राने  पास्ता, शेवया व कुरड्यासाठी प्रक्रियायोग्य असा 'बन्सी' प्रकारातील 'एनआयडीडब्ल्यू-११४९' हा नवा गहू वाण विकसित केला आहे.

नाशिक : राज्यात रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक आहे. मात्र बदलते हवामान,सिंचनसुविधा व तांबेरा प्रादुर्भावामुळे कमी उत्पादन या प्रमुख अडचणी आजवर राहिल्या आहेत. यावर सातत्याने अभ्यास करून कुंदेवाडी (ता.निफाड) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राने अधिक उत्पादकता व तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित केले आहेत. यामध्ये राज्यातील मागणी अभ्यासून पास्ता, शेवया व कुरड्यासाठी प्रक्रियायोग्य असा 'बन्सी' प्रकारातील 'एनआयडीडब्ल्यू-११४९' हा नवा गहू वाण विकसित केला आहे.पुढील वर्षापासून त्याचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. 

अखिल भारतीय समन्वित गहू सुधार प्रकल्पाच्या अनेक चाचण्या येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुरू असतात.त्याच अनुषंगाने २४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या यासंबंधी वार्षिक बैठकीत'एनआयडीडब्ल्यू ११४९' या 'बन्सी' प्रकारातील वाणाची भारतातील द्वीपकल्पीय विभागासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी नियंत्रित पाण्याखाली लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. हा वाण पास्ता,शेवया,कुरडया आदींसाठी उपयुक्त असल्याचे परिणाम तपासून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.केंद्रीय पीक वाण प्रसार समितीने त्यावर शिक्कामोर्तब केले असून तो प्रसारित केला जाणार आहे. 

पुढील वर्षीपासून कृषी संशोधन केंद्र निफाड यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी बीजोत्पादन घेऊन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याकामी केंद्राचे प्रमुख व  गहू विशेषज्ञ डॉ.सुरेश दोडके, गहू पैदासकार डॉ.उदय काचोळे,गहू पैदास विभागाचे साहाय्यक प्राध्यापक  डॉ. नीलेश मगर,कनिष्ठ गहू रोग शास्त्रज्ञ डॉ.भानुदास गमे, मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.योगेश पाटील,कीटक शास्त्र सहायक प्राध्यापक प्रा.भालचंद्र म्हस्के, कवकशास्त्रज्ञ डॉ.बबनराव इल्हे यांच्या टीमने ही कामगिरी केली  आहे. यापूर्वी प्रक्रिया योग्य बिस्कीट उद्योगासाठी 'फुले सात्त्विक' हा वाण दिला आहे. 

ठळक वैशिष्टे: 

  • द्वीपकल्पीय विभागातील जिरायती किंवा एका ओलिताखाली (एक पाणी पेरणीनंतर ४२ दिवसांनी) वेळेवर पेरणीसाठी शिफारसीत 'बन्सी' वाण 
  • तांबेरा रोगास प्रतिकारक 
  • प्रथिनांचे प्रमाण ११.५० टक्के 
  • शेवया, कुरडया व पास्ता यासाठी उत्तम 
  • पक्व होण्याचा कालावधी ११०-११५ दिवस 
  • उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल/हेक्टरी (एका ओलिताखाली) 

प्रतिक्रिया: 
महाराष्ट्रात प्रामुख्याने बन्सी/बक्षी प्रकारातील वाण अस्तित्वात वा उपलब्ध आहेत. त्यास कुरडया,पास्ता,शेवई व नूडल्स निर्मितीसाठी मोठी मागणी असते. हीच बाजू अभ्यासून जुन्या वाणांचे संवर्धन यासह निर्यातक्षम मागणी असलेल्या बाबीचा विचार करून उत्पादकता असलेला वाण विकसित केला आहे. त्याचा गहू उत्पादकांना फायदा होणार आहे. पुढील वर्षी त्याचे बियाणे उपलब्ध होणार आहे. 
-डॉ. सुरेश दोडके, गहू विशेषज्ञ,
कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी, ता.निफाड, जि.नाशिक. 
 


इतर कृषी प्रक्रिया
दर्जेदार पनीरनिर्मितीचे तंत्रउत्तम दर्जाचे पनीर बनविण्याकरिता म्हशीचे दूध...
पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे...नाशिक : राज्यात रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक...
आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीआले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...