agriculture news in Marathi, newly transfer in animal husbandry department, Maharashtra | Agrowon

'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

नागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका ठेवत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सचिव अनुपकुमार यांनी केलेल्या बदल्या रद्दबातल ठरविल्या होत्या. एकूण ६६ बदल्या १ जून रोजी रद्दबातल ठरविल्यानंतर त्यातील सहायक आयुक्‍त दर्जाच्या २१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पहिली यादी गुरुवारी (ता. १३) जाहीर करण्यात आली. पूर्वी या यादीत केवळ १५ अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

नागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका ठेवत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सचिव अनुपकुमार यांनी केलेल्या बदल्या रद्दबातल ठरविल्या होत्या. एकूण ६६ बदल्या १ जून रोजी रद्दबातल ठरविल्यानंतर त्यातील सहायक आयुक्‍त दर्जाच्या २१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पहिली यादी गुरुवारी (ता. १३) जाहीर करण्यात आली. पूर्वी या यादीत केवळ १५ अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ३१ मे रोजी काढण्यात आले होते. त्यानुसार नागपूर विभागातील ३७, कोंकण-२ विभागातील १४ पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यासोबतच सहाक आयुक्‍त पशुसंवर्धन (गट-अ) दर्जाच्या १५ अधिकाऱ्यांच्याही बदल्या त्या वेळी करण्यात आल्या. परंतु यातील अनेकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे गावे न मिळाल्याने त्यांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींमार्फत पशुसंवर्धन मंत्र्यांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर पशुसंवर्धनमंत्र्यांनी या बदल्यांना १ जून रोजी स्थगिती दिली होती.

सुमारे २१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पहिली यादी गुरुवारी (ता. १३) जारी करण्यात आली. पूर्वी सहायक पशुधन आयुक्‍तांच्या यादीत केवळ १५ अधिकाऱ्यांचा समावेश होता. आता सहा जणांची नावे वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सक्षम प्राधिकारी यांच्या आदेशान्वये या बदल्या करण्यात आल्या, असेही आदेशात नमूद आहे. मे महिन्यातील बदल्याचा हंगाम चुकल्यास त्यानंतर होणाऱ्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने होतात. त्यामुळे या बदल्यांचे आदेश पशुसंवर्धनमंत्री की मुख्यमंत्र्यांनी काढले याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. 

सहा जणांचा अतिरिक्‍त समावेश
डॉ. उमेश शालीग्राम हिरडकर यांची पूर्वीच्या बदली आदेशात नागपूर येथील रामटेकला बदलीचे आदेश होते. नव्या आदेशात मात्र त्यांना उमरेडला नियुक्‍ती देण्यात आली आहे. अरविंद गुलाबराव ठाकरे याचे नावच पूर्वीच्या बदली आदेशात नव्हते. त्यांना नव्या आदेशात स्थान देण्यात आले असून त्यांची नियुक्‍ती रामटेकवरून नागपूरला करण्यात आली आहे. अशा प्रकारे तब्बल सहा जणांचा नव्याने बदली आदेशात समावेश आहे.

इतर अॅग्रो विशेष
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...