agriculture news in Marathi, news regarding backyard garden in schools | Agrowon

पोषणमूल्ययुक्त आहारासाठी पाचशे अंगणवाड्यामध्ये परसबागा

माणिक रासवे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

 बालकांना सकस, पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विकास विभागातर्फे परभणी जिल्ह्यातील ५०० अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) डॉ. कैलास घोडके यांनी  दिली. 

 बालकांना सकस, पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विकास विभागातर्फे परभणी जिल्ह्यातील ५०० अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) डॉ. कैलास घोडके यांनी  दिली. 

कुपोषणमुक्तीसाठी बालकांना जीवनसत्त्व, प्रथिने युक्त सकस आहार देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महिला व बालविकास विभाग आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्यातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये परसबाग विकसित केली जाणार आहे. त्याअनुषंगाने रिलायन्स फाउंडेशनतर्फे अंगवाडी सेविका, पर्यवेक्षक यांच्यासाठी परसबाग निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन  जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) डॉ. कैलास घोडके, रिलायन्स फाउंडेशनचे आनंद पांडे आदी उपस्थित होते.

परसबागेसाठी किट

जिल्हा परिषदेमार्फेत अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना परसबाग लागवडीचे किट देण्यात आले. यामध्ये  विविध पिकांच्या बियाणे, विविध भाजीपाला, फळातील पोषणमूल्यांचे महत्त्व तसचे परसबाग निर्मितीच्या माहिती पुस्तिकांचा समावेश आहे.जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ५०० अंगवाड्यामध्ये परसबागा विकसित करण्यात येणार आहे. आतापर्यंत १० अंगणवाड्यांमध्ये परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे. परसबाग विकसित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आराखडा आहे. त्यानुसार पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या, वेलवर्गीय भाजीपाला, फळे, कंदमुळे आदी पिकांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तीनही ऋतूंमध्ये शाश्‍वत, ताजा, पौष्टिक भाजीपाला उपलब्ध होईल. त्यामुळे कुपोषणावर मात करणे शक्य होईल, असा विश्‍वास डॉ. घोडके यांनी व्यक्त केला. 


इतर ग्रामविकास
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...