agriculture news in marathi news regarding organic market in Sangali district | Agrowon

सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी हक्काची बाजारपेठ
अभिजित डाके
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सेंद्रिय शेती मॉल येत्या महिन्यात सुरू होईल. या मॉलमध्ये शंभर टक्के सेंद्रिय शेतीमालाची विक्री केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल.
- सुरेश मगदूम, प्रकल्प उपसंचालक,आत्मा, सांगली.

 

सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री करण्यासाठी येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाजवळ सेंद्रिय मॉल उभाण्यात आला आहे. हा मॉल येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी याचा फायदा होईल. मात्र, आजही सेंद्रिय शेतीमालाला ठोस अशी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तालुकानिहाय बाजारपेठ उभा करण्याची मागणी येथील शेतकरी करू लागले आहेत.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी यासाठी आत्माअंतर्गत सांगली जिल्ह्यात २६ गटांची स्थापना झाली आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत. या गटात सुमारे १०७७ शेतकरी असून १ हजार ३०० एकर क्षेत्र आहे. शेतकरी भाजीपाला, गूळ, हळद यासह अनेक पिकांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत आहेत. सध्या सेंद्रिय उत्पादित शेतीमालाला ठोस अशी बाजारपेठ उपलब्ध झाली नसल्याने शेतकरी बांधावरच शेतीमालाची विक्री करताहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी तालुकानिहाय बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीचे गट स्थापन झाले. त्यांना सेंद्रिय शेती कशी करायची याचे मार्गदर्शनही मिळाले. परंतु त्याची विक्री व्यवस्था कशी करायची याबाबत ठोस असे नियोजन अद्यापही झाले नाही. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला शेतीमाल स्वतः जावून विक्री करणे शक्‍य नाही. त्यामुळे जागेवरच विक्री करावी लागते आहे. त्यामुळे ब्रॅडिंग करणे कठीण बनले आहे. परिमाणी ग्राहकांचा शोध घ्यावा लागतो. सेंद्रिय शेतीचा गट तयार झाल्यानंतर उत्पादित झालेल्या शेतीमालाची कृषी विभागाशी संलग्न असलेल्या प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे उत्पादित केलेला शेतीमाल हा शंभर टक्के सेंद्रिय अाहे यावर शिक्कामोर्तब होतो.

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती मॉल उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात अाला. मॉलसाठी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत निधी उपलब्ध करू देण्यात आला आहे. त्यानुसार सांगली शहरातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाजवळ सेंद्रिय मॉलचे काम सुरू केले. हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. परंतु, अजून हा मॉल सुरू होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा कृषी कार्यालायात कृषी अधिकारी आणि खरेदीदार यांची बैठक झाली. या बैठकीत जे शेतकरी सेंद्रिय उत्पादन करतात अशा शेतकऱ्यांचे प्रमाणपत्र पाहून शेतीमालाची खरेदी केली जाईल असा निर्णय घेण्यात अाला आहे.

 

सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे मालाची विक्री करण्यासाठी अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. कृषी विभागाने सेंद्रिय शेतीमाल विक्री करण्यासाठी व्यवस्था करावी.
- सचिव येवले, शेतकरी, पडवळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.

 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...