नगर जिल्ह्यात नव्याने होणार ३७ हजारांवर शौचालये

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : बेसलाइन सर्वेक्षणानुसार राज्यात शौचालयांची बांधकामे पूर्ण करून हागणदारीमुक्तीची घोषणा झाली. मात्र, काही वाढीव कुटुंबांकडे शौचालये नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर सर्वेक्षण करून सरकारने या कुटुंबांची संख्या जाहीर केली. यात जिल्ह्यात ३७ हजार १२३ कुटुंबे आढळली, जी वाढीवमध्ये गणली गेली. आता त्या कुटुंबांनी शौचालये बांधावीत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातून देण्यात आली. 

राज्यात २०१२ मध्ये झालेल्या बेसलाइन सर्वेक्षणानुसार शौचालयांची बांधकामे करण्यात आली. ती कामे पूर्ण झाल्याचे स्पष्ट करीत राज्य सरकारने घाईने राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. ग्रामीण भागात सामान्य, गरीब कुटुंबांनी शौचालये बांधावीत, यासाठी सरकारने प्रत्येकी १२ हजारांचे अनुदान दिले. मात्र, अनेक कुटुंबांची नावे बेसलाइन सर्वेक्षणात नसल्याने, ती कुटुंबे ग्राह्य न धरता हागणदारीमुक्तीची घोषणा झाली.

ही घोषणा झाल्यानंतरही राज्यातील अनेक कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारने सहा महिन्यांपूर्वी पुन्हा वाढीव कुटुंबांचे सर्वेक्षण केले. राज्यातील या कुटुंबांची संख्या नुकतीच जाहीर केली. नगर जिल्ह्यात अशी ३७ हजार १२३ कुटुंबे आढळली. बेसलाइन सर्वेक्षणानुसार शौचालये बांधल्यास प्रत्येकी बारा हजारांचे अनुदान दिले जात आहे.   

तालुकानिहाय नवीन कुटुंबे 
अकोले ११३७
जामखेड   ११६३ 
कर्जत २९०१
कोपरगाव  ५०६१
नगर ११६५
नेवासे ४८२५
पारनेर १३३२
पाथर्डी २१४८
राहाता ४२९९ 
राहुरी १६४३ 
संगमनेर ४१००
शेवगाव   १७३२
श्रीगोंदे २१२२
श्रीरामपूर ३४९५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com