राज्यात नवे जलधोरण

राज्याची पहिली जलनीती २००३ मध्ये तयार झाली होती. त्यानंतर २०१२ मध्ये केंद्र शासनाने देशाची जलनीती तयार केली. त्यामुळे राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत जलधोरण महाराष्ट्राने देखील तयार केले आहे. नवे जलधोरण अधिक सुसंगत,व्यापक आणि लवचिक आहे. - राजेंद्र पवार, सचिव, जलसंपदा विभाग
जायकवाडी
जायकवाडी

पुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती देण्यात आली आहे. पूर व अवर्षणाची समस्या हाताळण्याबरोबरच आता पाण्याची उत्पादकता वाढविण्याचे ध्येय नव्या धोरणात ठेवण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राची जलनीती २०१९’मध्ये तयार झालेल्या नव्या जलधोरणानुसार जलआराखडे तयार होती. महाराष्ट्र जल मंडळ व राज्य जल परिषदेच्या मान्यतेशिवाय या आराखड्यांमधील कामे करता येणार नाहीत.  राज्याचे जलधोरण २००३ मध्ये तयार करण्यात आले होते. वाढते शहरीकरण, औद्योगिकरण; तसेच धोक्यात आलेले सिंचन या समस्यांचा विचार न करताच धोरणाची अंमलबजावणी सुरू होती. २०११ मध्ये धोरणाचा आढावा घेतला गेला. मात्र, फारसे बदल झाले नव्हते. २०१२ मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय जलधोरण जाहीर केले. त्यामुळे राज्याच्या जुनाट जलधोरणाचा आढावा घेणे आवश्यक होते. तथापि, त्याकडे दुर्लक्ष झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.  राज्यासमोरील आव्हाने 

  • पाण्याची मागणी व पुरवठ्यात कमालीचे असंतुलन  
  • पाणी उपलब्धता अनिश्चित बनली
  • काही भागात पाणीवापरावर जादा मर्यादा  
  • पूर व अवर्षण समस्येत वाढ  
  • निर्मित सिंचन क्षमता व वापर यात तफावत वाढली  
  • भूजल पातळीची घट चिंताजनक  
  • नागरी भागात पाण्याचा अपव्यय वाढला
  • पाण्याची गुणवत्ता खालावली 
  • मानवी चुकांमुळे नैसर्गिक जलसाठे धोक्यात 
  • नद्या, नाले, ओहोळ अतिक्रमणाच्या कचाट्यात   
  •  नव्या जलधोरणाची उद्दिष्टे

  •  शुद्ध पाण्यासाठी नियोजन करणे
  •  पाणीटंचाई व अवर्षण लक्षात घेऊन उपाययोजना 
  •  पाण्याचा वापर न्यायिक पद्धतीने करणे
  •  क्षेत्रीय स्तरावर पाणीवाटपासाठी धोरणात्मक सुधारणा
  •  समान पाणीवाटपाची हमी देणे 
  •  जल परिसंस्थेचे संरक्षण करणे 
  •  भूपृष्टावरील तसेच जमिनीखालील पाण्याचे संरक्षण व 
  • वाढ करणे पाण्याची उत्पादकता वाढविणे  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com