agriculture news in marathi next year elections of co_operative institutions satara maharashtra | Agrowon

साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची रणधुमाळी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जाणार आहे. यामध्ये सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींसह कऱ्हाडचा कृष्णा, सह्याद्री कारखाना, भुईंजचा किसन वीर साखर कारखाना आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा समावेश आहे. सध्याच्या राजकारणातील बदलत्या परिस्थितीत सहकारातील या महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुकांत भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस लक्ष घालणार आहेत. 

सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जाणार आहे. यामध्ये सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींसह कऱ्हाडचा कृष्णा, सह्याद्री कारखाना, भुईंजचा किसन वीर साखर कारखाना आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा समावेश आहे. सध्याच्या राजकारणातील बदलत्या परिस्थितीत सहकारातील या महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुकांत भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस लक्ष घालणार आहेत. 

केंद्र शासनाने बाजार समित्या बरखास्त करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, त्यापूर्वी सर्व राज्यांकडून अहवाल मागितला आहे. सर्व बाजार समित्यांनी पणन मंडळाला आपला अहवाल देण्यास सुरवात केली आहे. पुढील वर्षांत ऑगस्टमध्ये होणाऱ्या बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत आता स्थानिक आमदारांसह पक्षांकडूनही लक्ष घातले जाणार आहे. या विधानसभा निवडणुकीत सातारा, माण-खटावमध्ये भाजप, कोरेगाव, पाटणमध्ये शिवसेनेचा तर उर्वरित फलटण, वाई, कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी तर कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे स्थानिक आमदारांकडून त्या-त्या ठिकाणच्या बाजार समित्यांवरील आपली सत्ता कायम राहावी, यासाठी प्रयत्न होणार असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल.

तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये किसन वीर, कृष्णा आणि सह्याद्री साखर कारखान्यांचा समावेश आहे. सध्या भाजपने जिल्ह्यात रोवलेले पाय लक्षात घेता या तीनही कारखान्यांच्या निवडणुकीत भाजपकडून पॅनेल असेल. ‘किसन वीर’ची निवडणूक मे महिन्यात तर कृष्णा कारखान्याची निवडणूक जुलैमध्ये होईल. तसेच सह्याद्री कारखान्याची निवडणूक मार्च, एप्रिलमध्ये होणार आहे. हे तिन्हीही कारखाने राष्ट्रवादी व भाजपसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

सर्वांत महत्त्वाच्या निवडणुकीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यावेळेस भाजपचे किती संचालक बॅंकेत येणार, याची उत्सुकता आहे. विकास सेवा सोसायटी मतदारसंघ यासाठी महत्त्वाचा आहे. सध्या जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह संचालक जयकुमार गोरे, कांचन साळुंखे, प्रकाश बडेकर, माजी खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे हे सर्व मिळून भाजपची ताकद जिल्हा बॅंकेत वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील. राष्ट्रवादीकडून जिल्हा बॅंकेची सत्ता अबाधित राखण्यासाठीही प्रयत्न होतील. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...