Agriculture news in Marathi Night power supply to agricultural pumps | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांनी पेटवल्या मशाली...!

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 एप्रिल 2021

हा मशाल मोर्चा नाही ना? कुठल्या देवाच्या छबिन्याची मिरवणूकही नाही. ही दृष्ये आहेत रात्रीच्या अंधारात आपला जीव वाचविण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेटविलेल्या मशालीचे...!  

रोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : हा मशाल मोर्चा नाही ना? कुठल्या देवाच्या छबिन्याची मिरवणूकही नाही. ही दृष्ये आहेत रात्रीच्या अंधारात आपला जीव वाचविण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेटविलेल्या मशालीचे...!  

रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरात शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा केला जात आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आता दारे धरणासाठी मशाली पेटवल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या काळोखात शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या हाती सगळीकडे पेटत्या मशालीच दिसू लागल्या आहेत.

रात्रीची वेळ आणि पाण्याची निकड.. पहा video

 

रोपळे व परिसरातील मेंढापूर, खरातवाडी, पांढरेवाडी, चिलाईवाडी व जाधववाडी या भागात मार्च महिन्यापासून शेतीसाठी कमी दाबाने विद्युत पुरवठा केला जात होता. दरम्यान याच महिन्यात वीज बिलाचा तगादा वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या मागे लावला. वीजबिल भरूनही शेतकऱ्यांना उच्चदाबाने वीज पुरवठा करणे वीज वितरण कंपनीला शक्य झाले नाही. त्यामुळे दिवसाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाफ्यातही पाणी जात नव्हते. म्हणून वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतला.

आता रात्रीचा वीजपुरवठा उच्चदाबाने मिळू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले. मात्र, रात्री शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा त्रास होऊ लागला.त्यामुळे रोपळे व परिसरातील  शेतकऱ्यांनी स्वसंरक्षणासाठी रात्री शेतात दारे धरण्यासाठी मशाली पेटवल्या आहेत. शेतकऱ्यांनी मशाली पेटवल्या असल्या तरी वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतकरी आता आपला एक गट तयार करून दारे धरू लागले आहेत. त्यामुळे सगळीकडे आता रात्री मशालीच दिसू लागल्या आहेत.

आमच्या शेतात कोल्हे व लांडग्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे आम्हाला वीज वितरण कंपनीने दिवसा उच्चदाबाने वीज पुरवठा करावा.
- भारत व्यवहारे, शेतकरी - रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...