निलंगा तालुक्यात उसाला फुटले तुरे

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी पंधरा महिने झाले तरी कारखान्याकडून उसाची तोड होत नसल्याने मोठ्या अडचणीत सापडला आहे. उसाला तुरे फुटले असून उंदीरही लागल्याने ते ऊस पोखरत आहेत.
In Nilanga taluka, sugarcane bursts
In Nilanga taluka, sugarcane bursts

निलंगा, जि. लातूर : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी पंधरा महिने झाले तरी कारखान्याकडून उसाची तोड होत नसल्याने मोठ्या अडचणीत सापडला आहे. उसाला तुरे फुटले असून उंदीरही लागल्याने ते ऊस पोखरत आहेत. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होण्याची शेतकऱ्यांना चिंता आहे. 

आधी सततच्या दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटले, असल्याने जिल्ह्यातील बहुसंख्य कारखाने बंद होते. गतवर्षी व यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे तालुक्यातील मांजरा व तेरणा नदीपात्रात पाणी असून बॕरेजेसही, मध्यम प्रकल्प व लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. यंदा तालुक्यात उसाची जवळपास तीन हजार हेक्टर लागवड झाली असून मोठ्या प्रमाणात ऊस उभा दिसत आहे. त्यामुळे सर्वच कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध झाला, त्यामुळे कारखान्याकडे उसाची नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस नोंदीच्या तारखेपासून दोन महिने उशिरा ऊस गाळपास कारखाना घेऊन जात आहे. 

नोंद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस दोन महिने उशिरा का होईना कारखाने गाळप करतील की नाही अशी भीती निर्माण झाली असून कारखान्याच्या गट कार्यालयात शेतकरी खेटे घालत आहेत. निलंगा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या उसाची नोंद कारखान्यांकडे केली नसल्यामुळे तर काही सभासद नसल्यामुळे व उत्पन्नातील होणाऱ्या तोट्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निलंग्यातील शेतकऱ्यांची भिस्त असणारा जागृती कारखाना आहे. मांजरा परिवातील कारखाने उसाला योग्य भाव देतात. मात्र, १३-१४ महिने झाले तरी कारखाने ऊस गाळपाला घेऊन जात नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

ऊस उत्पादक सभासदांकडून पर्याय म्हणून तालुक्यातील हलगरा येथी हनुमान खांडसरी, व्ट्येंटी- ट्य्वेंटी कारखाना यांच्याकडे पाहिले जात आहेत. मात्र, यांच्याकडे सुद्धा वेटिंग लागल्यामुळे चकरा मारून शेतकरी हैराण झाला आहे. शेताला रस्ते झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी योग्य वेळी म्हणजे आक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवड केली असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला आहे. उसाला उंदीर लागला असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. काही उसाला तुरे फुटल्याने पोंग होऊन त्याच्या उतारावर परिणाम होणार आहे. निलंगा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तालुक्याच्या हक्काचा अंबुलगा सहकारी साखर कारखाना होता. मात्र, तो अनेक वर्षांपासून बंद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com