दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात अस्तित्व   

जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती व प्राणी यांनी समृद्ध आहे. सातपुड्यात पश्‍चिम घाटातील प्रदेशनिष्ठ समजल्या जाणाऱ्या अनेक पक्षी, प्राणी व वनस्पती प्रजाती आढळून येतात.
nilmani aamari
nilmani aamari

जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती व प्राणी यांनी समृद्ध आहे. सातपुड्यात पश्‍चिम घाटातील प्रदेशनिष्ठ समजल्या जाणाऱ्या अनेक पक्षी, प्राणी व वनस्पती प्रजाती आढळून येतात. यात आता पश्‍चिम घाटातील आर्द्र पानझडी व शुष्क पानझडी जंगलामधील प्रदेशनिष्ठ समजली जाणारी निलमणी आमरी ही वनस्पती सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वनस्पती अभ्यासकांनी शोधून काढली.   जळगांव जिल्ह्याला लाभलेल्या सातपुड्याचे वनस्पती वैभव व ते वाचवण्यासाठी वनविभाग करत असलेले अथक प्रयत्न पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. वन्यजीव संस्थेने यापूर्वी वनविभागाच्या सहकार्याने अनेक दुर्मीळ वनस्पती, वन्यजीव, सरीसृप, पक्षी नोंदवले आहेत. यात अजून एका दुर्मीळ वनस्पतीची भर पडली आहे. यामध्ये पश्‍चिम घाटातील आर्द्र पानझडी व शुष्क पानझडी जंगलामधील प्रदेशनिष्ठ समजली जाणारी निलमणी आमरी (Dendrobium peguanum) ही दुर्मिळ आमरी सातपुड्यात शोधण्यात वन्यजीव संरक्षण संस्थेचे राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे या वनस्पती अभ्यासक जोडीला यश आले आहे.  संशोधनातून वनस्पती फक्त पश्‍चिम घाटातच नाही; तर सातपुड्यात देखील अस्तित्वात असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांचा या वनस्पती विषयीचा शोधनिबंध नुकताच बायोइन्फोलेट या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. संशोधन कार्यात प्रा. डॉ. आर. जी. खोसे (अहमदनगर), प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन व अमन गुजर, बाळकृष्ण देवरे, संस्था अध्यक्ष रविंद्र फालक, सतीश कांबळे, रवींद्र सोनवणे, वासुदेव वाढे , गौरव शिंदे ,चेतन भावसार यांचे सहकार्य लाभले.  निलमणी आमरी ही आमरी कुळातील अतिशय छोटेखानी वनस्पती असून ती पुंजक्‍यात वाढते. अत्यंत छोटी असल्यामुळे तिचे अस्तित्व अनेकांच्या लक्षातही येत नाही. ही वनस्पती मुख्यत्वे साग वृक्षावर वाढते. फुलण्याच्या काळात ही आमरी पर्णहीन होते. फुले अतिशय छोटी असून मनमोहक असतात. या दुर्मीळ वनस्पतीचे संवर्धन करण्यासाठी साग वृक्षांचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे.

वनांचे संवर्धन महत्त्वाचे गेल्या काही वर्षापूर्वी जंगलात शेती करण्यासाठी सातपुड्यातील सागाचे घनदाट आच्छादन प्रचंड वृक्षतोडीमुळे विरळ झाले होते. परंतु गेल्या ६- ७ वर्षांपासून सातपुड्याचे गतवैभव प्राप्त होत आहे. सागवान जंगल परत उभे राहताना दिसून येत आहे. वनांचे संवर्धन योग्यरीत्या झाल्यास निसर्ग देखील पूर्वीची जैवविविधता पुनःस्थापित करतो. वरील संशोधन हे त्याचेच प्रतीक आहे. सातपुड्याच्या कुशीत अनेक रहस्य दडलेले आहेत. वन्यजीव संरक्षण संस्था वनविभागाच्या मार्गदर्शनात लोकसहभागातून येथील जैवविविधता संशोधनासोबतच संवर्धनाचे प्रयत्न करत असल्याचे वनस्पती अभ्यासक राहुल सोनवणे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com