Agriculture news in Marathi Nilwande Dam full | Agrowon

निळवंडे धरण तुडुंब

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण बुधवारी (ता. २३) पहाटे ४ वाजता पूर्ण क्षमतेने भरले आहे. या जलाशयाची पाणी पातळी ६४८.१६० मीटर तर पाणीसाठा ८३२८ दशलक्ष घनफूट झाल्याने हे जलाशय शंभर टक्के भरल्याचे शाखा अभियंता अरविंद जाधव यांनी सांगितले.

अकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण बुधवारी (ता. २३) पहाटे ४ वाजता पूर्ण क्षमतेने भरले आहे. या जलाशयाची पाणी पातळी ६४८.१६० मीटर तर पाणीसाठा ८३२८ दशलक्ष घनफूट झाल्याने हे जलाशय शंभर टक्के भरल्याचे शाखा अभियंता अरविंद जाधव यांनी सांगितले.

त्यामुळे वीज निर्मिती प्रकल्प व स्पिलवे मधून १६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून घाटघर मध्ये ६६ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याने आत्तापर्यंत ६२२० मिलिमीटर २०५ इंच पावसाची नोंद झाली आहे . तर त्याखालोखाल रतनवाडी येथे ६० मिलिमीटर एकूण ४७६० मिलिमीटर पाऊस झाला. तसेच भंडारदरा ४५, पांजरे ५८, वाकी ४० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

भंडारदरा जलाशय देखील १०० टक्के भरले असून जलाशयातून ८१२ क्युसेक विद्युत ग्रहातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भंडारदरा वीज निर्मिती सुरू झाली आहे. तर वाकी जलाशयातून १९७ क्युसेक विसर्ग सुरू असल्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले. तर तालुक्यातील सर्व २४ जलाशय भरले असल्याचे कार्यकारी अभियंता ए. इ. नानोर यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...