निळवंडे धरणाचे काम दोन वर्षांत होणार पूर्ण : मुख्यमंत्री ठाकरे

Nilwande dam will be completed in two years : Chief Minister Thackeray
Nilwande dam will be completed in two years : Chief Minister Thackeray

नगर : "जिल्ह्यातील दीर्घ काळ प्रलंबित प्रश्‍न सोडविले जातील, निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक ११०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण केली जातील,'' असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी (ता. ३०) नाशिक येथे नगर जिल्ह्यामधील विविध कामांचा तसेच प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यासह आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, मोनिका राजळे या वेळी उपस्थित होते.

निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारने हे काम करण्यास प्राधान्य दिले असून, दोन वर्षांत प्रलंबित कामे पूर्ण होतील. १८९ गावांतील २५ हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठीचे सप्टेंबर २०१८ पर्यंतचे अर्ज निकाली काढण्यात येत आहेत. नवीन अर्जासाठी ‘पोर्टल'' सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात कार्यवाही वेगाने होईल. शिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि नगर येथील उपकेंद्र सुरू करण्याची मागणी आहे. त्याचा निर्णय एका आठवड्यात घेऊन शासन निर्णय आठवडाभरात काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

‘नाइट लॅंडिंग''बाबत लवकरच निर्णय 

शिर्डी विमानतळ अद्ययावतीकरणाची मागणी आहे. इथल्या ‘नाइट लॅंडिंग' आणि इमारत विस्तारीकरणासंबंधी निर्णय लवकर घेतला जाईल. शिर्डीला येणाऱ्या भाविकांची सोय होण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही केली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘श्रीरामपूर येथे २२० केव्ही उपकेंद्र सुरू करण्याची मागणी आहे. त्यासंबंधी सरकार निर्णय घेऊन निविदा काढणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com