तासगावातील निमणी बंधारा हाउसफुल्ल

 Nimani dam Houseful in Tasgaon
Nimani dam Houseful in Tasgaon

येळावी, जि. सांगली : येरळा काठावरील शेतकऱ्याने केलेल्या मागणीनुसार पंधराच दिवसांपूर्वी येरळेत ताकारी योजनेतून सोडलेले कृष्णेचे पाणी अखेर तासगाव तालुक्‍यातील निमणी बंधाऱ्यात पोहोचले. एकीकडे ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईच्या काळात येरळेत कृष्णा अवतारल्याने येरळाकाठावरील द्राक्षबागायतदार व रब्बी हंगामधारक शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे .

मात्र बंधाऱ्याची दारे अद्यापपर्यंत माती टाकून बंद न केल्याने पाटबंधारे खात्याविरुद्ध शेतकऱ्यांतून संतप्त भावना उमटू लागल्या आहेत. 

तासगाव पश्‍चिम भागास वरदान ठरत असलेल्या येरळेवरील निमणी व वसगडे येथे येरळेवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. निमणी बंधाऱ्यात तेरा फूट उंचीचा जलसाठा करण्याची सोय आहे. या बंधाऱ्याची साठवणक्षमता २७ दशलक्ष घनफूट आहे. त्यावर मंजूर क्षेत्र २१५ हेक्‍टर आहे.

वसगडे बंधाऱ्याची साठवण क्षमता ५८ दशलक्ष घनफूट आहे. मंजूर क्षेत्र १२९३ हेक्‍टर आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तुर्ची, राजापूर परिसरात येरळा नदी कोरडी पडली होती. परिणामी द्राक्ष, गहू, हरभरा धोक्‍यात आला .

रब्बी पिके, द्राक्ष बागांना जीवनदान

ऐन पाणी टंचाईच्या काळात येरळा काठावरील शेतकऱ्यांनी  पिके, द्राक्षशेती वाचविण्यासाठी आरफळचे किंवा ताकारी योजनेचे पाणी येरळेत सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आले. सध्या हे पाणी निमणी बंधाऱ्यात पोहोचले असून या बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या निमणी, तुर्ची, ढवळी व तासगाव पश्‍चिम भागास ऊस शेतीसह गहू, हरभरा व शाळू सारखी रब्बी पिके व द्राक्षबागांना जीवनदान मिळाले आहे. दोन्ही बंधारे पूर्णपणे भरेपर्यंत हे पाणी सोडण्याची मागणी येरळाकाठावरील द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com