निम्न दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे संरक्षित पाणी आवर्तन

निम्न दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे संरक्षित पाणी आवर्तन
निम्न दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे संरक्षित पाणी आवर्तन

सेलू, जि. परभणी ः निम्न दुधना प्रकल्पाच्या धरणातून शुक्रवारी (ता. ३०) दुपारी डाव्या, तसेच उजव्या कालव्याद्वारे अखेर संरक्षित सिंचन पाणी आवतर्न सोडण्यात आल्याची माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिके, तसेच चारा पिकांचे उत्पादन घेण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी आवर्तने सोडण्यात यावीत, अशी सेलू, मानवत, जिंतूर, परभणी तालुक्यांतील शेतकऱ्यांची मागणी होती. सेलू येथील दबाव गटातर्फे या मागणीसाठी रास्तो रोको आंदोलन केले होते. अखिल भारतीय किसान सभेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांनी शेतकऱ्यांना दुष्काळात चारा पिकांचे उत्पादन घेता यावे, यासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांची दखल घेत निम्न दुधना धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता. ३०) दुपारी प्रकल्पाच्या डाव्या, तसेच उजव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले. प्रकल्पाच्या जलाशयात सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून १६ दलघमी एवढे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com