Agriculture news in Marathi Nine agricultural assistants have responsibility for 104 villages | Page 2 ||| Agrowon

नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 जून 2021

राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या गृहजिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांची प्रचंड वाणवा तयार झाली आहे.

बुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या गृहजिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांची प्रचंड वाणवा तयार झाली आहे. मुख्य शहरांलगतच्या तालुक्यात कर्मचारी, अधिकारी संख्येने अधिक असून दुर्गम भागात कोणीही नोकरी करायला तयार नसल्याने संग्रामपूरसारख्या तालुक्यात सध्या केवळ ९ कृषी सहायक १०४ गावांची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे. 

बुलडाणा जिल्हा मुख्यालयापासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या तालुक्यातील शेती समृद्ध आहे. जमीन सुपीक असून, प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. असे असताना कृषी यंत्रणा वर्षानुवर्षे खिळखिळी ठेवली जात असल्याने शेतकऱ्यांना योजनांचा फायदा फारसा होताना दिसत नाही. प्रत्येक योजनेचा लक्ष्यांक या ठिकाणी कधीच पूर्ण होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. या तालुक्यात ५० पदे मंजूर आहे. यात कृषी सहायकांची सर्वाधिक २५ पदे आहेत. सध्या येथे १६ पदे भरलेली असली, तरी प्रत्यक्षात फिल्डवर केवळ ९ कृषी सहायक कार्यरत आहेत. 

मंडळ कृषी अधिकाऱ्याचे एक, कृषी पर्यवेक्षकांची पाच, अनुरेखकाची चार, सहायक अधीक्षक एक, कनिष्ठ लिपिक दोन, शिपाई तीन अशी अर्धेअधिक पदे खालीच आहेत. सध्या या कार्यालयांतर्गत कार्यरत कृषी सहायकांपैकी एक सहायक अनधिकृतपणे गैरहजर आहे. एक वैद्यकीय रजा टाकून गेले. एक महिला सहायिका प्रसूती रजेवर तर एक कृषी सहायक बुलडाणा मुख्यालयात डेप्युटेशनवर पाठविलेले आहेत. एकूण भरलेल्या १६ कृषी सहायकांपैकी ११ जण कार्यरत आहेत. प्रत्येक कृषी सहायकांकडे ३ मुख्यालयांचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. ३ कृषी सहायकांकडे तांत्रिक पदभार आहे. परिणामी ९ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारी आहे.

शेतकरी अनभिज्ञ
कृषी सहायकांकडे असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे ते कुठल्याच एका गावात पूर्णवेळ देऊ शकत नाहीत. महिन्यातून एखाद-दुसरी भेट देतात. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावाचे कृषी सहायक कोण याचीही माहिती नसते. योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी सहायकांचा शोध घ्यावा लागतो. ज्यांना कृषी सहायक मुख्यालयी मिळतात, ते नशीबवान शेतकरी समजले जातात. कृषी पर्यवेक्षकांअभावी पोकरा, क्रॉपसॅप, महाडीबीटी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, ठिबक-तुषारची मोका तपासणी तसेच कार्यालयीन कामकाज प्रभावित झालेले आहे.

जळगाव-संग्रामपूर कोणालाच नको
कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात नेमणूक नको असते. अनेक जण नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर फक्त रुजू होतात आणि दुसऱ्याच दिवशी तेथून बदलीच्या मागे लागतात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात वजन वापरून बदल्या करून घेतात. बदल्यांसाठी दबाव व इतर मार्गांचा वापर केला जातो. परिणामी, संग्रामपूर, जळगाव जामोद या दोन्ही तालुक्यांतील कृषी कार्यालये कर्मचाऱ्यांअभावी खिळखिळी झाली आहेत.

लोकप्रतिनिधींचा वापर
या दोन तालुक्यांत कर्मचाऱ्यांअभावी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. असे असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांवर दबाव टाकण्यासाठी हे कर्मचारी लोकप्रतिनिधींचा वापर करून घेतात. शिवाय आई-वडिलांचे आजारपण, कौटुंबिक कारणे देऊन झालेल्या बदल्या रद्द करून घेतात. यामुळे या भागातील कर्मचारी संख्या कधीही पूर्ण होऊ शकलेली नाही.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...